Health

गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचे संकट आले असून अजूनही ते पूर्णपणे गेले नाही. असे असताना आता ओमिक्रॉनमुळे देखील अनेकांचे जीव जात आहेत. यामुळे आता चिंता व्यक्त केली जात आहे. आता मात्र एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

Updated on 08 February, 2022 10:47 AM IST
AddThis Website Tools

गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचे संकट आले असून अजूनही ते पूर्णपणे गेले नाही. असे असताना आता ओमिक्रॉनमुळे देखील अनेकांचे जीव जात आहेत. यामुळे आता चिंता व्यक्त केली जात आहे. आता मात्र एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता कोरोनाच्या ओमायक्रोन व्हेरिएंटवरही लस येणार आहे. या लसीची निर्मिती करण्यासाठी सिरम इन्स्टिटय़ूटला ड्रग्ज पंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मंजुरी दिली आहे. यामुळे आता ही लस देखील लवकरच उपलब्ध होणार आहे.

देशात ओमायक्रोन व्हेरिएंटने कोरोनाची तिसरी लाट आणली. या लाटेचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक झाल्याने सरकारची चिंता वाढली आहे. ही लाट वेळीच पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून लसीच्या निर्मितीला चालना दिली गेली आहे. याचा धोका लक्षात घेता सरकारने लवकरच पावले उचलली आहेत. ओमायक्रोनचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीकोनातून चाचणी आणि विश्लेषण करण्यासाठी लस बनवण्यास परवानगी द्या, अशी विनंती सिरम इन्स्टिटय़ूटने केली होती. अखेर आता हा प्रश्न देखील मार्गी लागला आहे.

पुण्यातील सिरम इन्स्टिटय़ूटने ओमायक्रोनच्या संसर्गावर दोन हात करण्यासाठी चाचणी आणि विश्लेषणासाठी एका लसीची निर्मिती करण्यास डीसीजीआयकडे परवानगी मागितली होती. हा अर्ज 2019 मधील नवीन औषधे आणि क्लिनिकल चाचणी नियमांमधील तरतुदींच्या आधारे मंजूर करण्यात आला आहे. यामुळे पुढील प्रक्रिया लवकरच पार पडणार आहेत. ओमिक्रॉनमुळे देखील अनेक लोकांना जीव गमवावे लागले आहेत.

दरम्यान, त्यामुळे ओमायक्रोन व्हेरिएंटवर लस येण्याचा मार्ग सुकर झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट खूपच भयानक होती. यामुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाले. यामुळे तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकारने उपाययोजना केल्या होत्या. तिसरी लाट तीव्र नव्हती. लॉकडाऊन देखील जास्त प्रमाणावर लावले गेले नव्हते. यामुळे ही लाट काहीशी कमी झाली आहे. लसीकरण देखील मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. यामुळे सध्या कोरोनाचा आलेख कमी होत आहे.

English Summary: Now Omicron's worries are gone, too vaccine
Published on: 08 February 2022, 10:47 IST