त्वचा निखारण्यासाठी महागड्या प्रोड्क्ट्स गरज नाही, फक्त वापरा बटाटा

24 October 2020 04:09 PM


आपली त्वचा निखारण्यासाठी  आणि चेहऱ्यावरील  डाग  काढण्यासाठी बाजारात अनेक  खूप महागडे प्रोड्क्ट आहेत. पण त्याचा काही उपयोग होत नाही. अशा महागड्या त्यात आपला पैसा वाया जातो. तसेच प्रत्येकांकडे हे महाग वस्तू असतात असे नाही. पण प्रत्येकांच्या घरात बटाटा असतोच. बटाटा म्हटल तर मधुमेह असलेले लोक पटकन नको नको म्हणतात. पण बटाटाचा गुण वाचून तुम्हीही बटाट्याचे चाहते व्हाल. त्वचेवरील आजारांवर बटाटा रामबाण औषधच आहे. आपणास यासाठी  वेगळी मेहनतदेखील घेण्याची  आवश्यक नाही.

बटाटा आणि हळद फेसपॅक

बटाटा त्वचेची समस्या सुधारण्यास मदत करतो. तर हळदीचे अँटीबॅक्टीरियल गुणधर्म  मुरुमांच्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करातात.  बटाटा आणि हळद एकत्र केलेला फेसपॅक चेहऱ्यासाठी  फायदेशीर आहे. फेसपॅक बनवण्यासाठी किसलेले बटाटे घ्या, किसलेल्या  कच्च्या बटाट्यात एक चिमूटभर हळद घाला आणि त्यास अर्ध्या तासाने चेहऱ्यावर लावा. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. आठवड्यातून दोन दिवस हा पॅक वापरल्याने काही दिवसात  आपला चेहरा निखारण्यास सुरुवात होईल.

बटाटा आणि अंडी फेसपॅक

बटाटा आणि अंडी फेसपॅक तयार करण्यासाठी अर्धा बटाटा किसून घ्या आणि त्याचा रस काढा. त्यात एक अंड्याचा पांढरा द्रव भाग  मिक्स करा.  तयार पॅक चेहरा आणि मानेवर लावा आणि २० मिनिटे तसेच राहू द्या. साध्या पाण्याने चेहरा धुवा. आपल्याला त्याचा परिणाम त्वरित दिसेल.  बटाटा आणि अंडी फेसपॅक्स लावल्याने आपला चेहरा चमकेल.

बटाटा आणि दही फेसपॅक

बटाट्यात दही मिसळून चेहऱ्यावर लावल्यास चेहरा चमकदार होतो. यासाठी कच्चा बटाटा किसून पेस्ट बनवा. आता या पेस्टमध्ये दही मिसळा आणि थोडावेळ ठेवा. पंधरा ते वीस मिनिटांनी चेहऱ्यावर  लावा. बटाटा आणि दही  याचे फेसपॅक  त्वचा साफ करतात. ज्यामुळे सुरकुत्या होण्याची समस्याही दूर होते.

बटाटा आणि लिंबू फेसपॅक

बटाटा पेस्ट बनवा. एक चमचा लिंबाचा रस घालून चेहऱ्यावर  लावा. १५ मिनिटांनी चेहरा धुवा. हे नैसर्गिक चेहऱ्यावरील ब्लीच म्हणून कार्य करते. हे आपल्या गडद त्वचेच्या रंगावर मात करण्यात मदत करते. एका चमचा  बटाट्याच्या रसामध्ये दोन चमचे लिंबाचा रस आणि दोन चमचे मुलतानी मिट्टी मिसळून पॅक तयार करा.

(वरील उपाय घरी करताना आधी संबंधित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)

skin whitening products त्वचा निखार बटाटा benefits of potatoes बटाटाचे फायदे आरोग्य health
English Summary: No need for expensive skin whitening products, just use potatoes

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.