Health

कडुनिंबाची सर्वाधिक लागवड भारतात केली जात असून त्याचे अनेक गुणकारी आणि आयुर्वेदिक फायदे आहेत. त्यामुळे पूर्वीपासून कडुनिंबाचा आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला जातो. कडुनिंबाची फक्त पानेच नव्हे तर या झाडाच्या बिया, मूळे, फुले आणि साल यांच्यामध्येही अनेक महत्त्वाची संयुगे असतात.

Updated on 30 September, 2020 6:44 PM IST


कडुनिंबाची सर्वाधिक लागवड भारतात केली जात असून त्याचे अनेक गुणकारी आणि आयुर्वेदिक फायदे आहेत. त्यामुळे पूर्वीपासून कडुनिंबाचा आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला जातो. कडुनिंबाची फक्त पानेच नव्हे तर या झाडाच्या बिया, मूळे, फुले आणि साल यांच्यामध्येही अनेक महत्त्वाची संयुगे असतात. त्यामुळे हे संपूर्ण झाडे गुणकारी असल्याचे दिसून येते. कडुनिंबामध्ये १३० वेगवेगळ्या प्रकारची जैवसंयुगे असतात, जी शरीराला व्याधीमुक्त करण्यास मदत करतात तसेच निरोगी जीवन जगण्यास पाठबळ देतात.

कडुनिंबामध्ये अनेक गुणकारी फायदे आहेत. या कडुनिंबामध्ये कर्कपेशी नष्ट करण्याची क्षमता असते. प्रत्येकाच्या शरीरामध्ये कर्कपेशी असतात. परंतु, त्याचा आपल्याला कोणताही त्रास होत नाही. मात्र, काही विशिष्ट परिस्थितीमध्ये पेशींचे संदेशग्रहणक्षमता क्षतीग्रस्त होते. त्यामुळे काही वेळा कर्करोग होण्याची शक्यता असते. परंतु, नियमितपणे रोज कडुनिंबाच्या पानांचे सेवन केले तर शरीरातील कर्कपेशींची संख्या प्रमाणात राहते.

कडुनिंबाच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅल्शिअम आणि खनिज यांची मात्रा असते. त्यामुळे हाडे बळकट करण्यासाठी कडुनिंबाची पाने उपयुक्त आहेत. तसेच सांधेदुखी, गुडघेदुखी होत असल्यास कडुनिंबाच्या तेलाने नियमितपणे मालिश करावी. कडुनिंब विषाणूप्रतिबंधक म्हणूनही काम करते. कडुनिंब हे पोलिओ, एचआयव्ही, कोक्सॅकी बी ग्रुप आणि डेंग्यूसारख्या अनेक विषाणूंना त्यांच्या प्रतिकृती निर्माण होण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच रोखते, असे गेल्या पन्नास वर्षांमध्ये संशोधकांनी दाखवून दिले आहे. कडुनिंब हे विषाणू संसर्गाच्या दरम्यान शरीराकडून मिळणारा ह्युमोरल आणि सेल मेडिएटेड अशा दोन्ही प्रकारचा प्रतिसाद अधिक तीव्र बनवतो असे दिसून आले आहे. कडुनिंबामध्ये (Azadirachtaindica) अँटीव्हायरल क्षमता असून त्यात विषाणू संसर्गाचा प्रतिबंध करणारे औषधी गुणधर्म आहे. कडुनिंब शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविते, पेशींच्या माध्यमातून कार्यरत होणा-या रोगप्रतिकार यंत्रणेला वेग देते.

कडुनिंबाचे तेल हे अॅथलिट्स फुट, रिंगवर्म व अशा कित्येक प्रकारच्या बुरशीजन्य संसर्गांना पूर्णपणे बरे करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. कडुनिंबामध्ये निंबिडोल (nimbidol)आणि गेडुनिन (gedunin) ही दोन औषधी संयुगे असतात, जी बुरशी नष्ट करण्याच्या कामी अत्यंत परिणामकारक आहेत. कडुनिंबाच्या तेलामध्ये आवश्यक फॅटी अॅसिड्स असतात. ही आम्लेसुद्धा जखम बरी करण्यास व आपली त्वचा निरोगी बनविण्यास मदत करतात. कडुनिंब कोणतेही कुरूप व्रण मागे न सोडता जखमा आणि बुरशीजन्य संसर्ग बरे करते.

कडुनिंबाची फुले ही अनॉरेक्सिया, मळमळणे, ढेकर येणे आणि पोटातील कृमींवरील उपचारासाठी उपयुक्त मानली जातात. कडुनिंबाची पाने ही पचनासाठी आणि चयापचयासाठी उपयुक्त असून त्यांच्यामुळे शरीरद्रव्ये चांगल्याप्रकारे स्त्रवतात असे आयुर्वेदामध्ये सांगण्यात आले आहे. कडुनिंबामुळे दातांमधील पोकळ्या स्वच्छ करून चवींची संवेदना सुधारण्यासही मदत होते. परिणामी कॅलरीज जाळण्याची आणि चरबी कमी करण्याची प्रक्रियाही वेगाने होते.

 

English Summary: Neem is beneficial in other diseases in cancer, know the benefits
Published on: 30 September 2020, 06:44 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)