शरीराला पोषक घटकांचा पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी आपण विविध प्रकारच्या पदार्थांचा आहारात उपयोग करतो. शरीराला प्रथिने, कर्बोदके, विविध प्रकारची खनिजांची आवश्यकता असते. या सगळ्या पोषक घटकांचा जर आपण विचार केला तर कडधान्ये शरीरासाठी फारच आवश्यक आहेत.
त्यामुळेच कडधान्या हा शरीरासाठी आवश्यक असल्याने त्यांचा रोजच्या आहारात वापर करावा असे डॉक्टर देखील आपल्याला सांगतात. प्रत्येक कडधान्यांच्या मध्ये स्वतःचे असे वेगवेगळे पौष्टिक गुणधर्म आहेत.कडधान्यं पैकी चवळी हे कडधान्य आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे याचे नियमित सेवन केल्यास अनेक आजार दूर होऊ शकतात. एवढेच नाही तर मधुमेहासारख्या आजारावर देखील चवळी गुणकारी आहे.चवळी सेवन करण्याचे कोणते फायदे आहेत या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ.
चवळी सेवनाचे आरोग्यदायी फायदे
- पोट साफ होण्यासाठी उपयुक्त- चळवळीतील सोल्युबल फायबर उच्च असल्यामुळे पचनशक्ती सुधारते व बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. त्यामुळे पोट व्यवस्थित साफ होते व दिवसभर उत्साह टिकून राहतो.
- वजन कमी करण्यासाठी- वजन कमी करण्यासाठी चवळि फार उपयुक्त आहे. चवळी मध्ये असलेल्या प्रोटीन रक्तातील इन्सुलिनची पातळी कमी करते. शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवते व त्यामुळे चरबी कमी होते.
- गरोदर महिलांसाठी उपयुक्त- गरोदरपणात महिलांनी चवळी नियमित खावी. यामुळे कॅल्शियमची झीज भरून निघते व बाळाची योग्य वाढ होते.
- प्रसूती चा त्रास कमी होण्यास मदत होते व प्रसूतीनंतर आईला भरपूर दूध येते.
- हृदयरोग- सवयीमुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहत असल्यामुळे रुदय रोगापासून दूर राहण्यास मदत होते. तसेच लोहाची कमतरता भरून निघते.
- मधुमेय रुग्णांसाठी उपयुक्त- चवळी हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फारच उपयुक्त आहे कारण यामध्ये कॅल्शियम अधिक प्रमाणात असल्याने ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
( टीप- कुठलाही औषधोपचार करण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा )
Published on: 11 December 2021, 12:21 IST