Health

बाजरी हे महाराष्ट्रातील प्रमुख तृणधान्य पीक आहे. बाजरीचा आहारात वापर खूप वर्षापासून आपले पूर्वज करीत आले आहेत.इतर तृणधान्य पेक्षा बाजरी हे पीक सर्वात जास्त ऊर्जा देते.शिवाय बाजरीमध्ये प्रथिनांचे प्रमाण 12 ग्रॅम,स्निग्ध पदार्थ 5 ग्रॅम, पिष्टमय पदार्थ सदुसष्ट ग्रॅम, फास्फोरस 242 मिलिग्रॅम, कॅल्शियम 42 मिलीग्राम इत्यादी पोषक घटक असतात. या लेखात आपण बाजरीचे आरोग्याला होणारे फायदे जाणून घेणार आहोत.

Updated on 07 November, 2021 1:39 PM IST

बाजरी हे महाराष्ट्रातील प्रमुख तृणधान्य पीक आहे. बाजरीचा आहारात  वापर खूप वर्षापासून आपले पूर्वज करीत आले आहेत.इतर तृणधान्य पेक्षा बाजरी हे पीक सर्वात जास्त ऊर्जा देते.शिवाय बाजरीमध्ये प्रथिनांचे प्रमाण 12 ग्रॅम,स्निग्ध पदार्थ 5 ग्रॅम, पिष्टमय पदार्थ सदुसष्ट ग्रॅम, फास्फोरस 242 मिलिग्रॅम, कॅल्शियम 42 मिलीग्राम इत्यादी पोषक घटक असतात. या लेखात आपण बाजरीचे आरोग्याला होणारे फायदे जाणून घेणार आहोत.

 बाजरीचे आरोग्यदायी फायदे

  • हृदयरोगापासून सुरक्षा- बाजरी मध्ये मॅग्नेशियम हा घटक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रक्तवाहिन्या संकुचित होत नाहीत. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते व रुदय सुरक्षित राहते. त्याचप्रमाणे बाजरी धान्यातील पोटॅशियम उच्चरक्तदाब कमी करण्यासाठी रक्तवाहिन्यांच्या तंत्रावर नियंत्रण ठेवतो.
  • रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करते- बाजरीमध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण अधिक असल्यामुळे घातक कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते.
  • मधुमेह नियंत्रित ठेवणे- मधुमेह टाइप 2 या प्रकारच्या रुग्णांसाठी बाजरीतील मॅग्नेशियम हा घटक इन्शुलिन व ग्लुकोज रिसेप्टरचीक्षमता वाढवून मधुमेह नियंत्रित ठेवतो.
  • पचनसंस्था सुधारणे- बाजरीतील तंतुमय पदार्थ जठरातील चयापचय क्रिया नियंत्रित करून वात दोष दुरुस्त करून कोठा साफ होण्यास मदत होते. त्यामुळे पचन संस्थेचे काम सुरळीत होऊन पोषणतत्वांची शोषण सुधारते. नियमित पचन होऊन विषारी पदार्थ शरीराबाहेर निघाल्यामुळे  रुदय,फुफुस व शरीरातील प्रतिरक्षा रचनेत फायदेशीर सुधारणा होतात.
  • कॅन्सर नियंत्रित करते- महिलांमधील स्तनांचा कॅन्सर यावर अतिशय लाभदायक आहे. कारण बाजरीतील तंतुमय पदार्थांमुळे हा आजार नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
  • दमा रुग्णांसाठी उपयुक्त- बालवयातील दमा या आजाराने ग्रस्त झालेल्या लहान मुलांच्या आहारात गव्हाची बाजरीधान्याचा अंतर्भाव केल्यास त्यांना लाभ होतो.
  • वजन नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त- बाजरीतील ट्रिप्टोफॅन हे उपयुक्त ॲमायनोऍसिड भुकेला कमी करण्यास मदत करते व वजन कमी होते. बाजरी मुळे घेतलेला आहार मंदगतीने पचविला जातो व जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते. भुकेची इच्छा कमी होते. शिवाय तंतुमय पदार्थ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कमी  आहारातही  भूक शमविण्याची समाधान लाभते.
  • त्वचेसाठी फायदेशीर- बाजरी मधील अमायनो ऍसिड, क व ड जीवनसत्व असल्यामुळे सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण होऊन त्वचा शुष्क होत नाही. सुरकुत्या पडत नाहीत.
  • केसांच्या वाढीसाठी उपयुक्त- बाजारात भरपूर प्रमाणात प्रथिने असल्यामुळे केसांची वाढ, मजबूतपणा आणण्यास मदत होते. केस गळ किंवा टक्कल पडत नाही.
English Summary: more health benifit to of millet more nutritional value inb millet
Published on: 07 November 2021, 01:39 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)