Health

संपूर्ण जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनानंतर आता एका नव्या आजाराने थैमान घातलं आहे. मंकीपॉक्स (Monkey Pox) असं या आजाराचं नाव आहे. ब्रिटनमध्ये जन्माला आलेल्या या आजाराने जगाची धाकधूक वाढवली आहे.

Updated on 24 July, 2022 3:49 PM IST

संपूर्ण जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनानंतर (corona) आता एका नव्या आजाराने थैमान घातलं आहे. मंकीपॉक्स (Monkey Pox) असं या आजाराचं नाव आहे. ब्रिटनमध्ये जन्माला आलेल्या या आजाराने जगाची धाकधूक वाढवली आहे.

आतापर्यंत अनेक जणांना मंकीपॉक्सचा संसर्ग (Monkeypox infection) झाल्याची माहिती ब्रिटनच्या (Britain) आरोग्य विभागाने दिली होती. दरम्यान, मंकी पॉक्सचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबई महानगरपालिका (BMC) खडबडून जागी झाली आहे.

नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मंकीपॉक्स (Monkeypox) या आजाराबद्दल जनजागृती करण्यास सुरुवात केलीय.

हे ही वाचा 
पीएम कुसुम योजनेत फक्त 10 टक्के गुंतवणूक करा आणि कमवा लाखों रुपये; सरकार देतंय अनुदान

मंकीपॉक्स आजाराबद्दल माहिती

मंकीपॉक्स हा विषाणूजन्य झुनोटिक रोग आहे जो प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील उष्णकटिबंधीय रेनफॉरेस्ट भागात आढळतो आणि इतर प्रदेशांमध्ये प्रसारित होत आहे.

मंकीपॉक्सचे चिकिस्तिय सादरीकरण (clinical presentation) देवी रोगासारखे आहे, देवी रोग हा ऑर्थोपॉक्सवायरल संसर्ग असून 1980 मध्ये या रोगाचे संपूर्ण जगभरात निर्मूलन झाले असे घोषीत केले होते. मंकीपॉक्स देवी रोगापेक्षा कमी संसर्गजन्य आहे आणि कमी गंभीर आहे.

ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स, इटली, पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन, यू.के., यू.एस.ए. या देशांमध्ये मंकीपॉक्स आजाराचा उद्रेक होत आहे. तसेच मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील देशांत हा आजार सहसा आढळून येतो.

हे ही वाचा 
Onion Prices: कांद्याच्या किमतीबाबद सरकारचं मोठं पाऊल; घेतला 'हा' निर्णय

मंकीपॉक्स आजाराची लक्षणे

1) मंकीपॉक्सची सामान्यत: लक्षणे ताप येणे,पुरळ आणि मोठ्या प्रमाणात गाठी (lymph node)येणे ही आहेत आणि त्यामुळे वैद्यकीय गुंतागुंत होऊ शकतात.

2) पुरळ पोट किंवा पाठी ऐवजी चेहऱ्यावर आणि हातपायांवर जास्त केंद्रित असते. पुरळ मोठयाप्रमाणात चेहरा ( ९५% ), हाताचे तळवे आणि पायांचे तळवे (७५%), तोंडातील व्रण (७०%) , जननेंद्रिय (३०%) आणि डोळे (२०%) दिसते.

3) मंकीपॉक्स हा सामान्यतः स्वयं-मर्यादित आजार आहे. ज्याची लक्षणे 2 ते 4 आठवड्यांपर्यंत असतात. रुग्णाची परिस्थिती गंभीर होऊ शकते.मृत्यू दर 1-10% पर्यंत असू शकतो.

4) लहान मुलांमध्ये या आजारची लक्षणं जास्त तीव्र आढळून येते.

महत्वाच्या बातम्या 
Gas Cylinder! घरगुती गॅसच्या किमतीत मोठा बदल; जाणून घ्या आजच्या किंमती
PM KISAN! आनंदाची बातमी; आता पीएम किसान योजनेचा हप्ता येणार 4,000 रुपये
Onion Prices: कांद्याच्या किमतीबाबद सरकारचं मोठं पाऊल; घेतला 'हा' निर्णय

English Summary: MonkeyPox Worldwide virus symptoms monkeypox
Published on: 24 July 2022, 03:49 IST