Health

Monkeypox Symptoms: जगभरात मंकीपॉक्सचे रुग्ण (Monkeypox) वाढत आहेत. त्याचा परिणाम आता भारतातही दिसून येत आहे. 14 जुलै रोजी केरळमध्ये मंकीपॉक्सची लागण झालेला पहिला रुग्ण आढळला होता. आतापर्यंत देशभरात मंकीपॉक्सची चार रुग्ण समोर आली आहेत.

Updated on 25 July, 2022 10:30 AM IST

Monkeypox Symptoms: जगभरात मंकीपॉक्सचे रुग्ण (Monkeypox) वाढत आहेत. त्याचा परिणाम आता भारतातही दिसून येत आहे. 14 जुलै रोजी केरळमध्ये मंकीपॉक्सची लागण झालेला पहिला रुग्ण आढळला होता. आतापर्यंत देशभरात मंकीपॉक्सची चार रुग्ण समोर आली आहेत.

मंकीपॉक्स कसा पसरतो? मंकीपॉक्सची लक्षणे कशी ओळखायची? मंकीपॉक्स टाळण्यासाठी कोणते उपाय आहेत? जाणून घ्या

मंकीपॉक्स हा एक संसर्गजन्य रोग आहे. जो संक्रमित ठिकाणी भेट देऊन किंवा संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने पसरतो. शरीरातून बाहेर पडणाऱ्या संक्रमित द्रव्यांच्या संपर्कातून, चावण्याद्वारे, संक्रमित प्राण्याला स्पर्श केल्याने याचा प्रसार होतो.

शहरी भागातील रहिवासी असलेल्या रुग्णांच्या वैद्यकीय नोंदींच्या विश्लेषणानुसार, मंकीपॉक्स संसर्ग झालेल्या 98 टक्के लोक हे समलिंगी किंवा उभयलिंगी पुरुष होते. या अभ्यासात असे आढळून आले आहे की, सुमारे 95 टक्के लोकांना लैंगिक संबंधादरम्यान एकमेकांना संसर्ग झाला आहे.

MonkeyPox: जगभरात मंकीपाॅक्स विषाणूचे थैमान; जाणून घ्या मंकीपाॅक्सची लक्षणे

मंकीपॉक्सची लक्षणे Monkeypox Symptoms

या लोकांमध्ये पुरळ, ताप, आळस, मायल्जिया डोकेदुखी आणि सुजलेल्या लिम्फ नोड्स यांसारखी लक्षणे आढळून आली आहेत. त्याची लक्षणे 2 ते 4 आठवडे टिकू शकतात. मंकीपॉक्सची लक्षणे प्राणघातक नसतात परंतु काही प्रकरणांमध्ये ते गंभीर आरोग्य समस्या निर्माण करू शकतात.

मंकीपॉक्स कसे ओळखावे

संक्रमित व्यक्तीमध्ये मंकीपॉक्स ओळखण्यासाठी, लक्षात घ्या की, जास्त ताप, डोकेदुखी, लिम्फ नोड्सची सूज, स्नायू दुखणे आणि कमजोरी असू शकते. मंकीपॉक्सच्या मुख्य लक्षणांपैकी एक म्हणजे चेहऱ्यावर आणि हातपायांवर मोठ्या प्रमाणात पुरळ येणे. उष्मायन कालावधी संसर्गापासून लक्षणे सुरू होण्यापर्यंत 6 ते 13 दिवसांचा असतो.

मंकीपॉक्स टाळण्यासाठी उपाय Remedies to prevent monkeypox

१. मंकीपॉक्स टाळण्यासाठी सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा.
२. एखाद्याला मंकीपॉक्सची लक्षणे दिसल्यास, घाबरू नका, ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
३. स्वच्छतेची काळजी घ्या. संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात असताना साबणाने हात धुवा.
४. सॅनिटायझर वापरा.

Health News: जगातील 'या' अकरा देशांमध्ये मंकीपॉक्सचा कहर, नेमका काय आहे हा आजार? जाणून घ्या

English Summary: Monkeypox Symptoms: How to recognize the symptoms of monkeypox?
Published on: 25 July 2022, 10:30 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)