Health

कोरोना महामारी मुळे गेल्या दोन सव्वा दोन वर्षापासून जगातील सगळे जनजीवन त्रस्त झाले असताना आता कुठे मोकळा श्वासघेता येत आहे. कोरोना महामारी तून सगळे काही परिस्थिती नॉर्मल होत असताना पुन्हा एकदा जगात मंकी पॉक्स या आजाराची दहशत निर्माण झाली आहे.

Updated on 22 May, 2022 10:09 AM IST

कोरोना महामारी मुळे गेल्या दोन सव्वा दोन वर्षापासून  जगातील सगळे जनजीवन त्रस्त झाले असताना आता कुठे मोकळा श्वासघेता येत आहे. कोरोना महामारी तून सगळे काही परिस्थिती नॉर्मल होत असताना पुन्हा एकदा जगात मंकी पॉक्स या आजाराची दहशत निर्माण झाली आहे.

जगातील जवळजवळ 11 देशांमध्ये या रोगाने कहर केला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर डब्ल्यूएचओ ने महत्वाची बैठक देखील बोलावली आहे. युरोपियन राष्ट्रे जसे की स्पेन, इटली, पोर्तुगाल, स्वीडन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया  तसेच आफ्रिकेचा काही भागांमध्ये स्थानिक आजारांच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.

मंकीपॉक्सच्या वाढत्या प्रमाणामुळे नागरिकांच्या संख्येत आणखी भर पडली आहे. बेल्जियम मध्ये या विषाणूची दोन प्रकरण तर स्पेनमध्ये 14 नवीन रुग्णांची भर पडल्याने लागण झालेल्यांची संख्या 21 वर पोहोचली आहे. कॅनडा मध्ये देखील दोन प्रकरणांची पुष्टी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने देखील कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री मंनसुख मंडविया यांनी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि आयसीएमआर ला बारकाईनं लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मंकीपॉक्स ग्रस्त देशांमधून प्रवासाचा इतिहास असलेल्या आणि या आजाराचे लक्षण असणाऱ्या प्रवाशांचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी कडे तपासण्यासाठी पाठवण्यास सांगण्यात आले आहे.

 नेमका काय आहे हा आजार?

 मंकीपॉक्स हा कांजण्या सारखा एक विषाणू आहे. परंतु या आजाराचा विषाणूजन्य संसर्ग वेगळा आहे. जर या आजाराचा इतिहास पाहिला तर 1958 मध्ये तो पहिल्यांदा माकडाला झाला होता व 1970 मध्ये प्रथमच  मानवामध्ये आढळून आला होता. मंकी पॉक्स या आजाराचा विषाणू मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील पर्जन्यमानात आढळतो.

 मंकीपॉक्स आजाराचे लक्षणे?

शरीरावर गडद लाल पुरळ, डोकेदुखी, व्यक्तीला फ्लूची लक्षणे दिसतात. निमोनिया ची चिन्हे दिसून येतात तसेच स्नायू दुखणे, अत्यंत थकवा जाणवणे, ताप येणे इत्यादी लक्षणे मंकी पॉक्स  झालेल्या व्यक्तींमध्ये दिसून येतात. ही लक्षणे दोन ते चार आठवड्यांपर्यंत दिसून येतात व स्वतःहून निघून जातात असे देखील म्हटले जाते. या आजाराच्या संबंधित मृत्यूचे प्रमाण अलीकडच्या काळात तीन ते 6 टक्क्यांपर्यंत आहे.

 मंकी पॉक्स संसर्ग कसा पसरतो?

 या आजाराने बाधित व्यक्ती किंवा प्राणी यांच्या संपर्कात आल्याने हा पसरतो. मंकी पॉक्सचा विषाणू रुग्णाला झालेल्या जखमेतून किंवा डोळे, नाक, कान आणि तोंडातून शरीरात प्रवेश करतो. तसेच उंदीर आणि माकड या सारख्या प्राण्यांमुळे हा विषाणू पसरण्याची भीती जास्त आहे. तसेच लैंगिक संपर्कातून देखील पसरू शकतो.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Farming Business Idea: ‘याफुलाची शेती शेतकऱ्यांना मिळवून देणार अधिकचे उत्पन्न; वाचा याविषयी सविस्तर

नक्की वाचा:Health Tips: कच्च दुध पित असाल तर सावधान! आरोग्यावर होतातहेघातक परिणाम

नक्की वाचा:Pm Kisan Yojana: मोठी बातमी! कृषीमंत्र्यानी सांगितलं 'या' दिवशी मिळणार शेतकऱ्यांना दोन हजार

English Summary: monkey pox desease spred eleven country in word so take precaution
Published on: 22 May 2022, 10:08 IST