Health

भारतात गुलाबी थंडीची चाहूल जाणवायला लागली आहे. नोव्हेंबर महिन्याला सुरवात झाली की आपल्याकडे थंडीला सुरवात होते. आताच दिवाळी पाडवाचा सन आपण सर्व्यांनी मोठ्या उत्साहाने साजरी केला दिवाळी संपताच थंडी अजूनच प्रकर्षाने जाणवायला सुरवात होते.

Updated on 17 November, 2021 9:49 PM IST

भारतात गुलाबी थंडीची चाहूल जाणवायला लागली आहे. नोव्हेंबर महिन्याला सुरवात झाली की आपल्याकडे थंडीला सुरवात होते. आताच दिवाळी पाडवाचा सन आपण सर्व्यांनी मोठ्या उत्साहाने साजरी केला दिवाळी संपताच थंडी अजूनच प्रकर्षाने जाणवायला सुरवात होते.

हिवाळ्यात आपल्या शरीराला अधिक पौष्टिक अन्नाची गरज असते, असं सांगतात की थंडीत खाल्लेलं आपल्या शरीराला जास्त मानवत. आपल्या भारतीय स्वयंपाकघरात सर्वात जास्त गहूच्या चपात्या ह्या बनवल्या जातात, पण ह्या थंडीच्या दिवसात बाजरीच्या भाकरी खाण्याचा सल्ला दिला जातो. शहरात बाजरीच्या भाकरीचे सेवन हे कमी प्रमाणात केले जाते परंतु ग्रामीण भागात बाजरीच्या भाकरी जास्त खाल्ल्या जातात. मित्रांनो आज आपण थंडीत बाजरीच्या भाकरी खाण्याचे फायदे जाणुन घेणार आहोत. चला तर मग कृषी जागरणच्या वाचक मित्रांनो जाणुन घेऊया याविषयीं सविस्तर.

 बाजरीच्या भाकरी खाण्याचे फायदे

»मित्रांनो बाजरी मध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. फायबर आपल्या शरीरासाठी महत्वाचे असते, फायबर मुळे आपली पचनसंस्था स्ट्रॉंग बनते शिवाय फायबर अन्न पचन करण्यास मदत करते, त्यामुळे बाजरीच्या भाकरीचे सेवन आपल्यासाठी लाभदायी सिद्ध होऊ शकते. मित्रांनो अनेक लोकांना सर्दीमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो, तसेच अपचनाची देखील समस्या उद्भवते अशा लोकांनी थंडीत बाजरीच्या भाकरी खाव्या जेणेकरून त्यांना या त्रासातून सुटका मिळेल. बाजरी मध्ये असलेले फायबर हे पोटाची पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते.

»मित्रांनो बाजरीच्या भाकरी नियमित खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. डॉक्टर देखील मधुमेहाच्या रुग्णांना दररोज बाजरीच्या भाकरी खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी बाजरीच्या भाकरी खाल्ल्या पाहिजे त्यामुळे त्यांची साखर हि नियंत्रणात राहील आणि त्यांना पोषक आहार देखील मिळेल.

 »बाजरीमध्ये असलेले घटक हे आपले हृदय स्ट्रॉंग ठेवण्यास मदत करतात, त्यामुळे बाजरीच्या भाकरी नियमित खाल्ल्याने आपण हृदयविकारापासून वाचू शकतो. बाजरीच्या भाकरीची एक विशेषता म्हणजे बाजरीची भाकरी चवीला खुपच उत्तम असते आणि शिवाय आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करते.

कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहिल्यास आपल्याला हृदयाशी संबंधित आजार होऊच शकत नाहीत त्यामुळे बाजरीची भाकरी रोज खाल्ल्याने आपण आपले हृदय निरोगी ठेऊ शकतो. बाजरी मध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपुर प्रमाणात असते आणि हे घटक आपल्या शरीरासाठी उपयुक्त असल्याचे सांगितलं जाते.

टीप :- सदर आर्टिकल मध्ये नमूद केलेल्या पद्धती आणि दाव्यांची कृषी जागरण पुष्टी करत नाही. या फक्त सूचना आहेत याचा उपयोग माहिती म्हणुन घ्या. असे कोणतेही उपचार/औषध/आहार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

English Summary: millet bread is most benificial for health specialy winter season
Published on: 17 November 2021, 09:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)