कधी मासिक पाळी चुकते किंवा वेळेवर येत नाही, तेव्हा स्त्रीच्या मनात पहिली गोष्ट येते ती म्हणजे गर्भधारणा. परंतु स्त्री शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसेल तर या समस्या उद्भवू शकतात. उदाहरणार्थ, PCOS किंवा PCOD मुळे मासिक पाळी येण्यास विलंब होऊ शकतो.
मात्र तसेच मासिक पाळीच्या विलंबाचे कारण नेमके काय असते हे समजत नाही. त्यात काही असे कारण देखील आहे ज्यामुळे मासिक पाळी उशिरा येते. याची कारणे नेमकी कोणती? याविषयी जाणून घेऊया.
1) ताण घेणे
शरीरातील तणावाची पातळी वाढली की, संप्रेरकांच्या पातळीला त्रास देतात. त्यामुळे तणावामुळे तुमची मासिक पाळी लांब किंवा उशीरा येऊ शकते किंवा वगळले जाऊ शकते. काही वेळा तणावामुळे महिलांना मासिक पाळीदरम्यान खूप वेदना होतात.
त्यामुळे स्वतःला रिलॅक्स ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही नियमित व्यायाम, योगासने, ध्यान किंवा श्वासोच्छवासाच्या व्यायामाच्या मदतीने तणावावर मात करु शकतात.
पीएफ खातेधारकांसाठी खुशखबर; 7 लाख रुपयांचा होणार फायदा, फक्त हे एकच काम करा
2) अचानक वजन कमी होणे
जास्त किंवा अचानक वजन कमी (Weight loss) होणे देखील तुमची मासिक पाळी थांबवू शकते. खरेतर, जेव्हा तुम्ही वजन कमी करण्यासाठी कॅलरीजचे प्रमाण खूप कमी करता तेव्हा ते ओव्हुलेशनसाठी आवश्यक असणारे हार्मोन्सची क्षमता कमी करते. यामुळे मासिक पाळीच्या नियमिततेवर परिणाम होतो. त्यामुळे निरोगी वजन राखण्याचा प्रयत्न करा.
3) वजन वाढणे
वजन कमी करण्याप्रमाणे, जर वजन खूप वाढले तर त्याचा परिणाम स्त्रीच्या मासिक पाळीवरही होतो. अशा स्त्रियांमध्ये, त्यांच्या शरीरात जास्त प्रमाणात इस्ट्रोजेन तयार होऊ शकते. हे अतिरिक्त इस्ट्रोजेन मासिक पाळी किती वेळा आणि कधी येते यावर परिणाम करू शकते. कधीकधी यामुळे स्त्रीची मासिक पाळी थांबू शकते.
शेतकऱ्यांनो मोहरीच्या 'या' सुधारित वाणाची करा शेती; मिळेल दुप्पट फायदा
4) अतिरिक्त व्यायाम
निरोगी राहण्यासाठी हल्ली सगळेच व्यायाम करतात. परंतु, अधिक प्रमाणात व्यायाम केल्याने त्याचा आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. जास्त व्यायाम केल्याने तुमच्या मासिक पाळीसाठी जबाबदार असलेल्या हार्मोन्सवरही विपरित परिणाम होतो.
जेव्हा तुम्ही अतिप्रमाणात वर्कआउट्स (Workout) करून शरीरातील भरपूर चरबी कमी करण्याचा प्रयत्न करता तेव्हा ते ओव्हुलेशन होण्यापासून रोखू शकते. अशा स्थितीत मासिक पाळी नियमित करण्यासाठी तुम्ही तुमची शारीरिक हालचाल कमी करावी.
महत्वाच्या बातम्या
मिरची उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; प्रतिक्विंटलला मिळतोय तब्बल १८ हजार ५०० रुपये दर
दिलासादायक! कांद्याच्या बाजारभावात सुधारणा, मिळतोय सर्वाधिक भाव; जाणून घ्या
16 ऑक्टोबरनंतर वृषभ, सिंह राशीसह या लोकांची चिंता वाढणार; जाणून घ्या राशीभविष्य
Published on: 11 October 2022, 11:43 IST