Health

पावसाळ्यात डोंगराळ भागांमध्ये या भाज्या वाढतात ह्या भाज्या नेमकेपणाने ओळखून खुडणाऱ्या आदिवासी महिला बाजारात त्याविक्रीसाठी घेऊन येतात. यातील काही भाज्यांमध्ये विष द्रव्य असतात.ते नेमके ओळखता आले नाही तर त्यातून संसर्ग होण्याची शक्यता असते.

Updated on 26 February, 2022 6:41 PM IST

पावसाळ्यात डोंगराळ भागांमध्ये या भाज्या वाढतात ह्या भाज्या नेमकेपणाने ओळखून खुडणाऱ्या आदिवासी महिला बाजारात त्याविक्रीसाठी घेऊन येतात. यातील काही भाज्यांमध्ये विष द्रव्य असतात.ते नेमके ओळखता आले नाही तर त्यातून संसर्ग होण्याची शक्यता असते.

त्यामुळे यातील काटेरी प्रकारातल्या काही भाज्या काढल्यावर त्या खड्यांचे मीठ घालून उकळून घेतले जातात. काही रानभाज्यांच्या देठाकडचा चिक काढूनच त्या शिजवल्या जातात. त्या भाज्यांचा रंग, वास आणि आकार यावरून त्यांची विषारीबिनविषारीगटात वर्गीकरण केले जाते.

  • औषधी गुणधर्म:-

पातेरे,भारंग,बिडासारख्या रानभाज्या बिनविषारी व सुरक्षित असतात.ज्या रानभाज्यांच्या पानांचा रंग गडद असतो. त्यांची चव थोडीशी तुरट व कडू असते. मात्र त्यात पौष्टिक गुणधर्म ही अधिक असतात. या भाज्याही तू कडून शिजवल्या जातात. करटुलसारख्या काटेरी फळे असणाऱ्या भाजीमध्ये नैसर्गिक जीवनसत्व असल्यामुळे ते पचनास सोपे असतात. आघाडा, माळा, पूननवर्व,करडू, मोरंगी, दवणा, काटेसावर, नारई, वागोटी, टाकळ, अंबाडी,भोकर, खडकतेरी, भोवरी यांसारख्या भाज्यांमध्ये जस्त( झिकं ) तांबे, कॅल्शियम याचे प्रमाण अधिक असते. रानकेळी हा खोकल्यावर रामबाण उपाय आहे. भारंगीची भाजी ही नवीन फुटलेल्या कोंबाच्या व पानाच्या स्वरूपात असते. यात प्रोटीन्सही भरपूर असतात.टाकळ्याची भाजी  ही मेथीच्या भाजी सारखी असते. टाकळीच्या पानांचा लेप विविध त्वचाविकारांवर लावतात. या भाजीला तखटा असेही म्हणतात.

शेवाळा खाजरा असतो म्हणून त्यासोबत काकड या वनस्पतीची आंबट फळे घालून भाजी करतात. शेवाळाचा कंद अनेक औषधांमध्ये वापरला जातो.

  • करटोली:-

 रक्तशर्करा नियंत्रित करण्यासाठी करटोली गुणकारी आहे. या फळभाजी मध्ये खूप बिया असतात.

  • बाफळी :-

 हेवी असते आणि कुळीथासारखे चपटे असते. ही भाजी चिरून उकडून, त्यात हरभऱ्याची डाळ घालून बनविली जाते. या भाजीच्या फळांचे तेलही काढतात. पोट दुखी जंत होणे यांसारख्या त्रासामध्ये या भाजीचे सेवन करतात.

  • हेळू :-

 ही रानभाजी औषधी असते.त्याचे पानेकुडाच्या पानासारखे लहान असतात.या भाजीला पेरूच्या आकारासारखे फळेही येतात. या फळांची भाजी केळीच्या चवीची लागते.

  • कडमड वेली :-

पांढऱ्या रंगाच्या या वेलीला कोवळे अंकुर येतात. याची पाने जाड असतात. ही भाजी चींचेपेक्षाही आंबट असते. अधिक प्रमाणात लसुन वापरून हे भाजी बनवली जाते. ह्या भाजीत पोटाचे आजार बरे करण्याची क्षमता आहे. या भाजीतील गुणधर्मामुळे कफप्रवृत्तीही दूर होते.

  • आघाडा :-

 या भाजीमध्ये जीवनसत्व भरपूर प्रमाणात आढळते. ही भाजी पाचक असून मुतखडा, मुळव्याध व पोट दुखीवर गुणकारी आहे. आघाडा रक्तवर्धक आहे व हाडे बळकट होण्यासाठी तो खाल्ला जातो.

English Summary: medicinal properties of forest vegetable(raanbhaaji)and health benifit
Published on: 26 February 2022, 06:41 IST