निसर्गाने आपल्याला फळांच्या रूपाने एक अन्नद्रव्याचे मोठ्या प्रमाणावर असलेले गोदाम दिलेले आहे. जर आपण कधी आजारी पडलो तर डॉक्टर आपल्याला फळे खाण्याचा सल्ला देतात, कारण फळांमध्ये जीवनसत्वे, खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. प्रत्येक ऋतूनुसार येणारी फळे जर आपण खाल्ली तर वेगवेगळ्या प्रकारचे फळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरासाठी एकंदरीत आरोग्यासाठी फार उपयुक्त आहेत.
सध्या बाजारामध्ये डाळिंब हे फळ बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, हे फळ आपल्या सौंदर्यासाठी व आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. आपल्या आरोग्यासाठी असलेले सगळ्या प्रकारचे औषधी गुण डाळिंबामध्ये विपुल आहेत. आज आपण डाळिंबाच्या गुणकारी गोष्टींविषयी जाणून घेणार आहोत.
जर आपण डाळिंबाचा रस घेतला तर तो एक पित्तशामक म्हणून उपयोगी येऊ शकतो. डाळिंबमुळे अपचनाचा त्रास कमी होतो, तसेच डाळिंब कावीळ झालेल्या रुग्णासाठी उपयुक्त आहे. डाळिंबाच्या आतील पांढऱ्या रंगाच्या बिया असतात त्या बिया तोंडाच्या आणि घशाच्या अल्सरवर उपयोगी असतात. डाळिंबाचा रस हृदयविकारासाठी उपयुक्त आहे. हृदयातील अतिसूक्ष्म रक्तवाहिन्या मोकळा ठेवण्याचे काम डाळिंब करतो असे तज्ज्ञांचे मत आहे.
कर्करोग व मधुमेह यांच्या साठी उपयोगी डाळिंब मधील औषधी गुण कर्करोग आणि मधुमेहासारख्या दुर्धर आजारांपासून दूर ठेवण्यासाठी मदतगार ठरतात. डाळिंबाचा रस त्वचेसाठी उपयुक्त असतो. चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी डाळिंबाचा रस गुणकारक असून अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये डाळिंबाच्या रसाचा वापर करतात. आरासोबत नियमित डाळिंब खाणाऱ्यांची त्वचा ही तजेलदार दिसते. इतकी औषधी गुणधर्म असलेले डाळिंब शक्य तितक्या वेळेस खाण्यास काही हरकत नाही.
Published on: 28 July 2020, 06:00 IST