निसर्गामध्ये विविध औषधी वनस्पती आहेत. ज्यांचे आरोग्यासाठी खूप फायदा होतो. त्यापैकी काहींचे लागवड शेतात करता येते तर काही वनामध्ये उगवतात. परंतु ह्या औषधी वनस्पती म्हणजे निसर्गाने दिलेला एक अनमोल ठेवा आहे.
जर या औषधी वनस्पतींचे फायदे पाहिले तर याची कल्पना येईल. या लेखामध्ये आपण विविध प्रकारच्या वनौषधी व त्यांचे आरोग्यदायी फायदे यांची माहिती घेणार आहोत.
विविध प्रकारच्या वनौषधी व त्यांचे आरोग्यदायी फायदे
1- अडुळसा- या वनस्पतीची पाने व फुले यांचा रस मधात घालून दिल्यास दमा, खोकल्यावर वापरतात. पानाचे पोटीस, संधिवात, गुडघे भरले तर त्यावर बांधतात. सुक्या पानाच्या विड्या, तंबाखू प्रमाणे वापर करतात त्यामुळे दमा जातो. तसेच याच्या अंग रसाने मूत्रदाह कमी होतो.
2- बेल-बेलाची फळे मधुमेह, श्वसनाचे विकार तसेच त्रिदोष आणि अपचनावर उपयुक्त आहे.
3- कोरफड- कोरफडीच्या पानांचा रस अपचन, मोठ्या आतड्याची शिथिलता, अरूची, अग्निमांद्य, पचन, रक्ती आव व आमांशवर उपयोगी पडतो. याच्या पानांचा रस हळदीवर पानथरी वाढली तर देतात.
4- कडी पत्ता - याचे पाने कढीत वापरतात. याच्या वापराने दुर्वास नाहीसा होतो. याच्या पानांचा काढा सर्पदंशावर देतात. तसेच पाणी व मुळे यांचा काढा इतर औषध निर्मितीसाठी वापरतात.
5- वावडिंग- वावडिंग ची फळे कृमिनाशक म्हणून वापरतात.याची सध्या मागणी वाढत असल्यामुळे दोन बाय दोन मीटर अंतराने लागवड करावी.
6- बिब्बा- याच्या सालीतील रस हाडांच्या व्रणावर, परम्यावर, सांधेदुखी, दमा,अजीर्ण आणि मज्जातंतूच्या रोगावर उपयोगी पडतं.
7- शिवण- हा एक पानझडी वृक्ष असून कोकणात चांगल्या पद्धतीने वाढतो. या झाडाचे लाकूड उत्तम असून याची मुळे दश गुळात वापरले जातात. या वनस्पतीची लागवड आठ बाय आठ मीटर अंतराने एक बाय एक बाय एक फुटाचे खड्डे खोदून करतात. चे रोप लागवडीनंतर रोपांना पाणी साचू देऊ नये. सहा ते सात वर्षांनी हे झाड खतास आणि पाण्यास चांगला प्रतिसाद देते त्यामुळे पाण्याची सोय असल्यास त्याला हेक्टरी 50 किलो नत्र, 25 किलो स्फुरद व 25 किलो पालाश अशी वर्षातून तीन वेळा देणे योग्य आहे.
8- अर्जुन- नदीकाठाला आढळणारा हा पानझडी वृक्ष हृदयाचा टॉनिक म्हणून ओळखला जातो. याशिवाय या झाडाची साल रक्तशुद्धी, हाडमोड, रक्तस्त्राव, कानाचे विकार, मुका मार इत्यादी विकारांत वापरली जातात. लागवड रोपापासून दहा बाय दहा मीटर अंतराने करावी.
9- सर्पगंधा- याचा उपयोग मेंदूचे विकार, रक्तदाब इत्यादी विकारांवर रामबाण समजले जाते. या वनस्पतीच्या मुळाना चांगली मागणी आहे.
10- खैर- हा पानझडी वृक्ष डोंगर उतारावर आणि माळराना वर आढळतो. कात तयार करण्यासाठी या वनस्पतीच्या गाभ्याच्या लाकडाचे खूप मागणी आहे.
तसेच रक्तशुद्धी कारक व खोकला नाशक म्हणून उपयुक्त आहे.
11- गुळवेल-हा वेल कोकणात अल्प प्रमाणात आढळतो. याच्या खोडास खूप मागणी असून मधुमेह, कावीळ, ताप, त्वचारोग, संधिवात, कृमी रोग यावर खोडाचा वापर केला जातो.
महत्वाच्या बातम्या
Published on: 28 April 2022, 01:50 IST