हळदीमध्ये असलेल्या जंतुनाशक गुणधर्मामुळे फार प्राचीन काळापासून भारतामध्ये हळदीचा वापर विविध औषधांमध्ये केला जातो. हळद एकाच वेळी खाद्यपदार्थांचा आस्वाद वाढवते तसेच सुरेख रंग देते यासोबतच त्वचेच्या समस्या देखील कमी करते.त्यामुळे बहुसंख्य सौंदर्यप्रसाधनांमध्ये हळदीचा वापर केला जातो.
हळदीमध्ये कर्क्युमिन औषधी घटक असून यामध्ये अँन्टिऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात आहेत. अशा एंटीऑक्सीडेंट घटकांचे प्रमाण जास्त असणाऱ्या पदार्थांचा समावेश जर आहारात केला तर आजारांची शक्यता कमी होते. या लेखात आपण हळदीचे औषधी गुणधर्म जाणून घेणार आहोत.
हळदीचे औषधी गुणधर्म
- हळदीमुळे जिवाणूच्या वाढीस प्रतिबंध होतो परिणामी हळदीचा वापर जखमांवर लावण्यासाठी केला जातो. खादीमध्ये असलेल्या अँटीसेप्टीक गुणधर्मामुळे जखम लवकर भरण्यासाठी मदत होते.
- हळदीमधील घटकांमुळे विविध प्रकारच्या संसर्गापासून तुमचे संरक्षण होते. मुख्यतः घशाला संसर्ग झाला असल्यास दुधात हळद घालून पिल्यानंतर फायदा होतो.
- हळद रोज खाल्ल्याने पित्त वाढत असले तरीजेवण पचण्यास मदत होते.
- आपल्या रोजच्या आहारात नियमितपणे हळदीचा वापर केल्यास शरीरातील साखरेचे पातळी नियंत्रणात राहत असल्याचे तज्ञांचे मत आहे.
- हळदीचे पाणी पिण्यामुळे आपले डोके शांत होण्यास मदत मिळते.
- हळदी मध्ये असलेल्या एंटीऑक्सीडेंट घटकांचा उपयोग हा कर्करोगाच्या पेशींना नष्ट करण्यासाठी देखील होऊ शकतो.
- पोट साफ होत नसल्यास गरम पाण्यात लिंबू हळद आणि मध टाकून ते पाणी घ्यावे. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते व पोटही साफ होते.
- हळदीचे पाणी नियमितपणे प्यायलास मुक्त विषारी कणांशीलडण्यास मदत होते.
- डाळीच्या पीठामध्ये थोडी हळद, थोडा बारीक केलेला का पूर्व चार ते पाच थेंब मोहरीचे तेल टाकून अंघोळीच्या वेळी अंगाला लावावे.यामुळे त्वचा रोग, खाज थांबून पूर्ण अंगकांती सुधारते.
शंभर ग्राम हळदी मधील घटक
- पाणी सहा ग्रॅम
- 390 कॅलरी ऊर्जा
- साडेआठ ग्रॅम प्रथिने
- 9ग्रॅम स्निग्ध पदार्थ
- 5मिलीग्राम लोह
- 9ग्रॅम कर्बोदके
Published on: 01 December 2021, 03:09 IST