आर्द्रक हे कंदवर्गीय वनस्पती आहे. याचा कंद आपण आर्द्रक म्हणून जाणतो. याचा वापर एक औषधी म्हणून व विविध औषधीमध्ये केला जाते. आर्द्रकमध्ये अनेक औषधीय तत्व आहेत, जे आपल्या आरोग्यासाठी चांगली मानली जातात. आर्द्रकचे रोपटे 2-3 फुटांपर्यंत वाढते यास पाने व पिवळी फुले येतात. या सर्वांचा औषधी म्हणून वापर होतो. सर्व घरांमध्ये आर्द्रकाचा वापर केला जातो. हिवाळ्यात गळ्यातील संक्रमनासाबंधी आर्द्रकाचा रस व चहा मध्ये सुध्दा आर्द्रकाचे सुंठ टाकले जाते.
आर्द्रकास हळद इलाईची व काळे मिरे यासमान पवित्र व गुणकारी मानले जाते. भारतीय उपखंडात या वनौषधीचा वापर भारतीय आयुर्वेदिक उपायांमध्ये केला गेला. नंतर इंग्रजांनी युरोपात याची आयात केल्या नंतर भारतभर याची शेती व व्यापार सुरु झाला. अशाप्रकारे हे संपूर्ण भारतातील परिवारांच्या स्वयंपाक घरात पोहोचले. आर्द्रकाचे अनेक प्रकार आहेत. त्यात पिवळा व पांढरा गर असे दोन प्रमुख प्रकार आहेत. पांढरा जास्त स्वादासाठी तर पिवळा कमी तीव्र स्वादासाठी ओळखला जातो. भारतात याचा वापर हिवाळ्यात चहामध्ये तीव्र स्वादासाठी केला जातो. तर मसाल्यात भाज्यांना चांगली चव यावी यासाठी आर्द्रकचा वापर मसाल्याचा एक घटक म्हणून होतो.
आर्द्रकचा कंद जमिनीत असतो. त्यांना बाहेर काढून उन्हात सुकवून मूळ रूपातील आर्द्रक तयार केले जाते. आर्द्रक पूर्णपणे सुकवून वापरले जाते. हे फार कमी प्रमाणत खराब होते. सुकल्यावर हे 'सुंठ' म्हणून संबोधले जाते. ह्याचा वापर अनेक ठिकाणी होतो. आर्द्रकाचा वापर आयुर्वेदिक औषधीमध्ये केला जातो. भारतात घरगुती औषधामध्ये आर्द्रक बऱ्याच प्रमाणत वापरले जाते. विविध खाद्यपदार्थात जसे ज्यूस, मुरांबे, मसाला भाज्यमध्ये आर्द्रकाचा वापर होतो.
आर्द्रकचे आरोग्यदायी फायदे:
- मळमळी वर उत्तम औषध
उलटी व मळमळीची समस्या उदभवल्यास आर्द्रकाचा काप मधासोबत तोंडात ठेवून चावल्यास मळमळ नाहीशी होते. गळ्यातील कफ खोकला ज्यात फार कफ येतो. त्यावर आर्द्रकाच्या रसात मध मिळवून घेतल्यास लवकरच आराम मिळतो. - भूक वाढविणे
आर्द्रकच्या उग्र गंधामुळे व तीव्र स्वादामुळे तोंडातील ग्रंथींना बेचव वाटणारे अन्न चवीचे वाटू लागते. आर्द्रकाचे काप जेवण्याआधी तोंडात ठेवून चावल्या नंतर काहीवेळाने जेवल्यास अन्न चविष्ट लागते. त्यामुळे भूक वाढते. - पोटातील समस्या
अपचन, पोट दुखणे, पोटात वायू जमा होणे यावर रोज सकाळी मधासोबत आर्द्रकाचा रस कोमट पाण्यासोबत घेतल्यास वरील समस्या दूर होतात. - सर्दीपासून बचाव
सर्दीत गळ्यात कफ होतो. नाकाच्या नासिका बंद पडतात. अशा वेळी 2 चमचे आर्द्रक रस व मध कोमट पाण्यासोबत सर्दी बसेपर्यंत घेतल्यास सर्दी बरी होते. - शरीरात कामोत्तेजना वाढविणे
आयुर्वेदात बऱ्याच ठिकाणी आर्द्रकाचा वापर शरीरात यौन इच्छा अधिक प्रबळ करण्यासाठी व अधिक परिणामकारक करण्यासाठी होतो. याचे उल्लेख सापडतात. - शरीराच्या सांध्याच्या दुखण्यावर परिणामकारक
रोज सकाळी उन्हात बसून आर्द्रकाच्या तेलाची सांध्यावर चांगली मालिश करून गरम पाण्याने आंघोळ केल्यास सांध्यांच्या दुखण्यात कमतरता येते. ह्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. - रक्तप्रवाह सुरळीत करणे
आर्द्रकात झिंक मॅग्नेशियम आणि क्रोमियम सारखे खनिज असतात. त्यामुळे आर्द्रकचे मधासोबत सेवन पहाटे निर्जळी केल्यास रक्त प्रवाह बऱ्याच प्रमाणात सुरळीत होतो. - श्वासासंबंधी समस्यावर प्रभावशाली
आर्द्रकाचा उग्र गंध व तीव्र स्वाद यामुळे हे एक बहुगुणी मानले जाते. हे श्वास नलिकेतील घाण बाहेर काढणे, श्वास घेण्यास त्रास व दम भरणे यावर प्रभावशाली औषध मानले जाते. आर्द्रक कुटून एका कपड्यात टाकून त्याचा ताजा गंध नियमित घेतल्यास श्वासासंबंधी अनेक समस्या दूर होतात.
सय्यद जुबेर, डॉ. ए. आर. सावते व मोहम्मद शरीफ
अन्न अभियांत्रिकी विभाग, अन्नतंत्र महाविद्यालय,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
Published on: 03 May 2019, 12:56 IST