Health

शेवगा हे पीक कोरडवाहू शेतकर्यांतसाठी वरदान ठरते. शेवग्याच्या झाड अतिशय लवकर वाढते. भारतामध्ये बहुतेक सर्व उष्ण, आदर हवामान असलेल्या ठिकाणी शेवग्याचे उत्पादन घेतले जाते. शेवगा मध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्वे असतात.शेवग्याची पाने, शेंगा, कोवळ्या फांद्या आणि बियांमध्ये पोषक घटक असतात.

Updated on 27 November, 2021 8:39 PM IST

 शेवगा हे पीक कोरडवाहू शेतकर्‍यांसाठी वरदान ठरते. शेवग्याच्या झाड अतिशय लवकर वाढते. भारतामध्ये बहुतेक सर्व उष्ण, आदर हवामान असलेल्या ठिकाणी शेवग्याचे उत्पादन घेतले जाते. शेवगा मध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्वे असतात.शेवग्याची पाने, शेंगा, कोवळ्या फांद्या आणि बियांमध्ये पोषक घटक असतात.

तसेच जीवनसत्व  अ, ब आणि क, खनिजे, लोह  आणि सल्फर मोठ्या प्रमाणात असते. त्यासोबतच भरपूर प्रमाणात पोषक घटक आणि रोगप्रतिकारक घटक असतात. या लेखात आपण शेवग्याच्या सेवनाचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत.

 शेवग्याच्या आरोग्यदायी फायदे

  • शेवग्याच्या पानांच्या रसाचा सेवनाचे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. शेवग्याच्या पानांचा रस मधाबरोबर घेतल्यास डायरिया,जुलाबावर गुणकारी आहे. या रसामुळे पोटातील कृमींचा नाश होण्यास मदत होते.
  • शेवग्याच्या पानांचा रस मधुमेह असणाऱ्या व्यक्तीचे गुलकोज ची मात्रा नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते. शेवग्याच्या पानांचा रस त्वचेसाठी अँटीसेप्टीक म्हणून वापरला जातो.
  • डोकेदुखीचा त्रास उद्भवल्यास शेवग्याची पाने कपाळावर सोडून लावल्या डोकेदुखी कमी होते. तसेच शरीराच्या भागावर सूज आली असल्यास ती कमी करण्यासाठी शेवग्याचा पाल्याचा उपयोग होतो.
  • शेवग्याच्या शेंगा मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे हाडांच्या कुठलेही आजार उद्भवत नाही. शेवगा मुळे शरीराची रक्त शुद्धीकरण  व्यवस्थित होते. त्यामुळे त्वचेचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.
  • शेवग्याच्या पानापासून तयार केलेले सूप अस्थमा आजारामध्ये औषधाचे काम करते.
  • शेवग्याच्या शेंगाचे सुप पिल्याने ब्राँकायटिसचा त्रास कमी होतो.शेवग्यामध्ये असलेले नियासिन,  रायबोफ्लेवीन, फॉलिक ऍसिड व बी कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे  पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.
  • मुतखडा तसेच रुदय रोग, कर्करोग यासारख्या गंभीर आजारांवर शेवग्याच्या प्रभावी उपयोग होतो.तसेच शेवग्याचापान,फुल,फळ,बिया,साल आणि मूळ अशा सर्वच गोष्टींचा उपयोग आयुर्वेदिक औषध तयार करण्यासाठीहोतो
  • शेवग्याच्या पानाची भाजी सेवन केल्याने आतड्यांना उत्तेजन देऊन पोट साफकरते त्यामुळे जठराचा कर्करोग टाळण्यासाठी फायदा होतो. तसेच आतड्यातील जखमा भरून काढण्यासाठी उपयुक्त ठरते.
  • शेवग्याच्या पानांचा रस आणि मध मोतीबिंदू  झालेल्या रोग्यासाठी फायदेशीर ठरतो.शेवग्याच्या पानांचे चूर्ण कॅन्सर आणि हृदय रुग्णांसाठी उपयुक्त औषध आहे.
  • शेवग्याचे सेवन रक्तदाब नियंत्रणात राहते. शेवग्याचे चूर्ण पाणी निर्जंतुक करण्यासाठी वापरले जाते.
  • शेवग्यामध्ये अ जीवनसत्व असते जे सौंदर्यवर्धक स्वरुपात काम करते.तसेच डोळ्यांसाठी लाभदायक असते. चेहर्यावरील पिंपल चे प्रमाण हे कमी करण्यास मदत होते.
English Summary: many health benifit of drumstick and most useful in high bloodpressure
Published on: 27 November 2021, 08:39 IST