Health

आपल्या सर्वांचे आवडते फळ म्हणजे आंबा. असा कोणी नसेल की, ज्याने आंबा खाल्ला नसेल. आंब्याच्या हंगामात प्रत्येकजण आंब्याची चव चाखत असतो. आंबा खाल्ल्याने अनेक फायदे आरोग्यासाठी चांगले आहे, पण तुम्हाला माहिती आहे का आंब्याचे पानेही आरोग्यदायी आहेत.

Updated on 12 September, 2020 2:45 PM IST


आपल्या सर्वांचे आवडते फळ म्हणजे आंबा. असा कोणी नसेल की, ज्याने आंबा खाल्ला नसेल. आंब्याच्या हंगामात प्रत्येकजण आंब्याची चव चाखत असतो. आंबा खाल्ल्याने अनेक फायदे आरोग्यासाठी चांगले आहे, पण तुम्हाला माहिती आहे का आंब्याचे पानेही आरोग्यदायी आहेत. हो आंब्याच्या पानांचा आपल्या आरोग्यसाठी फायदा होतो. आंब्याच्या पानांत बरेच औषधी गूण आहेत. आंब्याच्या पानांचे फायदे इतके वैविध्यपूर्ण आणि व्यापक आहेत. हे पाने जेव्हा उमलतात तेव्हा पानांचा रंग हा लालसर व जांभळा असतो. त्यानंतर हिरव्या रंगात वाढतात. आंब्याच्या पानांमध्ये अ, , आणि सी जीनवसत्वासह अनेक पौष्टिक घटक असतात. आंब्याच्या पानांमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि फिनोल्सची मात्रा जास्त असल्याने त्यांना अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात.

आंब्याच्या पानांचे औषधी फायदे काय आहेत

रक्तदाब पातळी कमी करते

आंब्याची पाने रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. यासह आंब्याची पाने रक्तवाहिन्या मजूबत बनवत असतात.

Treats gall & kidney stones पित्त आणि मुतखडावर उपचार

आंब्याच्या पानांचा सर्वात महत्वाचा उपयोग होतो ते म्हणजे हे पाने पित्त आणि मुतखडाचा आजारावरही उपायाकारक आहेत. आंब्याच्या पानांची बारीक पावडर पाण्यासोबत दररोज घेतल्यास मूतखडा बाहेर पडण्यास मदत होते.

Helps in Managing Diabetes मधुमेह नियंत्रित करण्यास मदत

आंब्याची पाने मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.कोवळ्या आंब्याच्या पानात टॅनिन असते त्यात अँथोसॅनिडीन्स असतात.मुधमेहाच्या प्राथमिक स्तरावर असल्यास आंब्याची पाने फार गुणकारी ठरतात.

 Cures respiratory problems श्वसनसंस्थेवरील समस्या करते दूर

आंब्याचे पाने श्वसनसंस्थेवरील समस्या दूर करण्यासही फायदेशीर आहे.  विशेषत: आस्था, सर्दी आणि ब्राँकायटिस ग्रस्तांसाठी आंब्याचे पाने अधिक उपयुक्त असतात. आंब्याची पाने पाण्यात मधासोबत उकळून घ्यावे. हे उकळलेले पाणी पिल्याने  खोकल्यावर अधिक गुणकारी आहे. बऱ्याचवेळा आपला आवाज बसत असतो म्हणजे त्याला आपण गळा बसणे असेही म्हणत असतो. त्यासाठी आंब्याच्या पानाचे पाणी खूप फायदेकारक आहे.

Good for skin and hair

आंब्याच्या पानांचा अर्क त्याच्या अँटिऑक्सिडेंटमुळे त्वचेचे वरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. यासह केसांची वाढीसाठी फायदेशीर आहेत आंब्याची पाने. कान दुखीवर आहे गुणकारी जर तुमचे कान दुखत असतील तर घरगुती उपाय म्हणून तुम्ही आंब्याचे पानांचा उपयोग करु शकतात. आंब्याच्या पानाचा रस काढावा. एक चमचा आंब्याचा पानाचा रस हा कानदुखी गुणकारी ठरतो.

Keeps stomach clean पोट साफसाठी फायदेशीर आहेत आंब्याची पाने

कोमट पाण्यात थोडी आंब्याची पाने घालावी, रातभर तशीच ठेवावीत. दुसऱ्या दिवशी आंब्याचे पाने असलेले पाणी ढवळून घ्यावे आणि रिकाम्या पोटी प्यावे. यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. दरम्यान हे पाणी दिवसभर पिल्याने टॉक्सिन शरिराबाहेर फेकल्या जाते आणि पोट साफ राहते.

English Summary: Mango leaves health benefits, useful for kidney stones
Published on: 12 September 2020, 02:45 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)