Health

आंबा पिकीतो रस गळीतो कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो हे गीत आपल्या कडे खूप प्रसिद्ध आहे.

Updated on 26 April, 2022 7:31 PM IST

आंबा पिकीतो रस गळीतो कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो हे गीत आपल्या कडे खूप प्रसिद्ध आहे.कोकणच्या भुमित आंब्याचे असे आगळेवेगळे स्थान आहे.आंब्याचे पन्हे,लोणचे, पोळी,गुळंबा,साखरंबा,आंबेडाळ अशी विविध व्यंजने या काळात होतात. पण ७०च्या दशकात आंब्याचे अर्थकारण आणि या धंद्यात परप्रांतीय मंडळी सक्रिय झाली आणि व्यापारात राक्षसी नफा कमवण्याच्या नादात केमिकल चा पिकवलेला आंबा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचला.पण अनेक मराठी कुटुंब प्रामाणिकपणे हा व्यवसाय करत आहेत. आज आपण आंब्याच्या फळा विषयी माहिती, औषधी उपयोग,पिकवण्याच्या पध्दती,कृत्रिमरीत्या पिकवलेला आंबा खाण्यामुळे होणारे दुष्परिणाम,नँचरल आंबा ओळखायची पध्दती या विषयी माहिती करून घेणार आहोत.चला तर मंडळी सुरुवात करुया.

         ‎आंबा हा विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारं झाड आणि फळ आहे. अवीट गोडीच्या या फळाला महाराष्ट्रात कोकणचा राजा म्हणतात. एप्रिल-जून हा या फळाचा मोसम असतो. आंब्याचा उगम नक्की कुठे झाला हे अज्ञात आहे परंतु दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियामधे मोठ्या प्रमाणातील जैववैविध्य पाहता आणि तेथील २५० ते ३०० लक्ष वर्षांचा जीवाश्मांचा इतिहास पाहता आंब्याचा उगम ह्याच भागात झाला असावा असे मानण्यात येते.कच्च्या आंब्याला कैरी म्हणतात. कैरी ही नेहमीच चवीला आंबट असते, पण जर नसेल तर तिला खोबरी कैरी असे नाव आहे. आंबा फळाचा राजा आहे.

दक्षिण आशियामधे हजारो वर्षापासून आंब्याची लागवड करण्यात येत आहे. दक्षिण आशिया तथा भारताच्या संस्कृतीमध्ये आंब्याला विशेष महत्त्व आहे. आंब्याची पाने (डहाळ्या) अनेक धार्मिक हिंदू कार्यक्रमांत वापरण्यात येतात. आंबा हे भारत आणि पाकिस्तान या देशांचे राष्ट्रीय फळ, बांग्लादेशाचे राष्ट्रीय झाड आणि फिलिपाईन्सचे राष्ट्रचिन्ह आहे.

आंब्याचे औषधी फायदेः

आंब्यात व्हिटॉमिन ए, आयर्न, कॉपर आणि पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात. उन्हाळ्यात आंबा खाणे फायदेशीर ठरते.

आंब्यात शर्करा असल्याने आंब्यापासून शरीरास ऊर्जा मिळते. त्यामुळे तुम्हाला अॅक्टीव्ह वाटते. उन्हाळ्यात आंबा खाण्याऐवजी मॅंगो शेक किंवा कैरीचे पन्हे घेणे अधिक फायदेशीर ठरेल.आंब्यात व्हिटॉमिन सी भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याचबरोबर चेहऱ्यावरची चमक वाढते आणि सुरकुत्या कमी होतात. आंब्यात फायबर्सही मुबलक असतात.आंब्यात सोडियम आणि कोलेस्ट्रोलही नाही. त्यामुळे उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनाही त्याचे सेवन करता येते.

 वजन कमी करतोःलिमिटमध्ये खालल्यास पोषक तत्वांमुळे आणि फायबरमुळे शरीरातील अतिरीक्त चरबी नष्ट होते. याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होते.

आंब्यात मोठ्या प्रमाणात अॅटीऑक्सीडेंट्स असतात. यामुळे आंबा खाल्ल्याने तुम्हाला कोलोन कॅन्सरपासून सुटका मिळण्यास मदत मिळते.

 आंब्यात भरपूर प्रमाणात फायबर असतात. आंब्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यास मदत मिळते. सोबतच हृदयाशी निगडीत अनेक रोगांपासूनही सुटका होते.

आंबा हा अॅंटी एजिंगसारखं काम करतो. यात वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात, जे चेहऱ्यावर ग्लो आणण्यास मदत मिळते.

आंब्यात व्हिटॅमिन ई असतं जे सेक्स लाईफसाठी चांगलं असतं.आंब्यात व्हिटॅमिन बी मोठ्या प्रमाणात असतं. जे तुमच्या मेंदुच्या विकासासाठी गरजेच असतं. जर तुम्हाला तुमची स्मरणशक्ती वाढवायची असेल तर नियमीत आंब्याचं सेवन केलं पाहिजे.

कच्च्या कैरीचा गर अंगाला लावून अंघोळ केल्यास घामोळ्याचा त्रास होत नाही. कैरीच्या बाठीचे चूर्ण हिरड्यांच्या तक्रारी कमी करण्यास उपयुक्त आहे .बाठीचे चूर्ण पाण्यात घालून अंघोळ केल्यास घामोळ्याचा त्रास होत नाही.

 आंब्याची कोवळी पाने चावून नंतर टाकून द्यावीत. त्या रसाने आवाज सुधारतो, खोकला कमी होतो आणि हिरड्यांचा पायोरीयाही कमी होतो.

आंब्याच्या पानांचा चीक टाचांच्या भेगा कमी करण्यास उपयुक्त आहे.आंब्याचा गोंदाचा सांधेदुखीत खूपच उपोयोग होता.ऐरेंड तेल, लिंबाचा रस, हळद आणि आंब्याचा गोंद सम प्रमाणात घेऊन ते मिश्रण शिजवून एकजीव करावे. त्याचा लेप सांधा निखळणे, पाय मुरगळणे, लचाकणे ह्यासाठी गुणकारी आहे. पिकलेला आंबाशक्तीवर्धक आणि अतिशय रुचकर आहे. आंब्याने शरीराची कांती सुधारते आणि पोषणही उत्तम होते. आंब्यात अ आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात आहेत. अ जीवनसत्व जंतुनाशक तर क जीवनसत्व त्वचारोग हारक आहे. त्यामुळे आंबा उत्तम आरोग्य देणारा आहे. 

 आंब्याची कोवळी पाने टॅनिनने युक्त असतात. डायबेटिसची सुरवात असेल तर ही पाने वाळवून पावडर करावी व पाण्यात रात्रभर भिजवून ती गाळून सकाळी हे पाणी प्यावे. त्याने मधुमेहाची लक्षणे कमी होतात.अॅजिओपथी, रेटिनोपथी मध्ये ती गुणकारी आहेत. ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी, रक्तवाहिन्यांचे काठिण्य कमी करण्यासाठी तसेच व्हेरिकोज व्हेन्स मध्येही ही पाने उपयोगी आहेत.अस्वस्थता- हायपर अँग्झायटीमुळे आलेली अस्वस्थता या पानांनी दूर करता येते. त्यासाठी अंघोळीच्या पाण्यात ही पाने टाकून त्या पाण्याने अंघोळ करावी. 

पित्तखडे अथवा मूत्रखड्याचा त्रास होत असेल तर पानांचे बारीक चूर्ण पाण्यात भिजवून रात्रभर ठेवावे व हे पाणी सकाळी प्यायलाने पित्तखडे, मूत्रखडे मोडतात व शरीराबाहेर पडतात.सर्व श्वासविकारांवर म्हणजे सर्दी, ब्राँकायटीस, अस्थमा यावर पानांचा पाण्यात उकळवून केलेला काढा घेतल्याने बरे वाटते. त्यात थोडा मध घातला तर कफावर गुणकारी ठरतो. त्याने बसलेला आवाज सुटण्यासही मदत होते. 

ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी, रक्तवाहिन्यांचे काठिण्य कमी करण्यासाठी तसेच व्हेरिकोज व्हेन्स मध्येही ही पाने उपयोगी आहेत.अस्वस्थता- हायपर अँग्झायटीमुळे आलेली अस्वस्थता या पानांनी दूर करता येते. त्यासाठी अंघोळीच्या पाण्यात ही पाने टाकून त्या पाण्याने अंघोळ करावी. पित्तखडे अथवा मूत्रखड्याचा त्रास होत असेल तर पानांचे बारीक चूर्ण पाण्यात भिजवून रात्रभर ठेवावे व हे पाणी सकाळी प्यायलाने पित्तखडे, मूत्रखडे मोडतात व शरीराबाहेर पडतात.सर्व श्वासविकारांवर म्हणजे सर्दी, ब्राँकायटीस, अस्थमा यावर पानांचा पाण्यात उकळवून केलेला काढा घेतल्याने बरे वाटते. त्यात थोडा मध घातला तर कफावर गुणकारी ठरतो. त्याने बसलेला आवाज सुटण्यासही मदत होते. 

आयुर्वेदप्रचार

आंब्याच्या पाँप्युलर जाती./व तो कोणत्या जातीचा आहे याची परिक्षा.

देवगड हापूस

देवगड हापूसला जास्त सुगंध असतो. देवगड हापूसचा रंग पिवळसर आणि काहीसा केशरी असतो. आंब्याचा आकार बऱ्यापैकी कोयरीसारखा आहे. तर देठ लहान आणि तोंड निमुळतं असतं.गर केशरी आणि पिकल्यावर हे फळ सुरकुतलं जातं. देवगड खूपच चवदार आणि गोड असतो. देवगड आंबा खाताना याची चव जिभेला लागते. देवगड हापूसची साल पातळ असते.

रत्नगिरी हापूस

रत्नागिरी हापूसला देवगड हापूसच्या तुलनेत कमी सुगंध असतो. हा आंबा पिकल्यावर त्याचा रंग पिवळा धम्मक होतो. चवीला अत्यंत गोड आणि गर थोडा कमी असतो.२०० ते २५० ग्रॅम असं रत्नागिरी हापूसचं वजन असतं. इतर आंब्यांपेक्षा रत्नागिरी आंबा अधिक गोड असतो. या आंब्याची चव घशाला लागते. रत्नागिरी हापूसची साल जाड असते.

पायरी

कोकणात रत्नागिरीतील काही भाग आणि वेंगुर्ले, कुडाळ, मालवण, कणकवली या भागात पायरी आंबा मोठ्या प्रमाणात मिळतो. हापूस आंब्यापेक्षा जास्त उत्पादन देणारी ही जात आहे. पायरी आंबा मध्यम आकाराचा, आकर्षक लाल रंगाचा असतो. हा आंबा रसाळ असून गोड असतो. पण पिकल्यानंतर हा आंबा जास्त काळ टिकत नाही.

English Summary: Mango is medicinal plant for our health know about how this
Published on: 26 April 2022, 07:26 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)