तिळाच्या तेलात भीमसेनी कापूर घाला छान उकळी आल्यानंतर गॅस बंद करा हे तेल थंड होऊ द्यात थंड झाल्यानंतर एका पॅकबंद बाटलीत ठेवा. शरीरात ज्या ठिकाणी आपल्याला वेदना होत आहेत किंवा जॉईंट चा त्रास ज्या ठिकाणी होत आहे तिथे हे तेल चोळून मसाज करून लावा.गुडघा दुखत असेल, सांधे दुखत असेल मांड्या, हात-पाय दुखत असतील तर हे तयार केलेले तेल रात्री झोपताना चोळून चोळून लावा. सोबतच रात्री झोपताना एक चमचा मेथी एक ग्लासभर पाण्यात भिजत घाला सकाळी उठल्यानंतर मेथी दाणे चावून चावून खावा आणि त्यावर मेथी भिजत घातलेले पाणीसुद्धा प्या.
होतील पायातील सर्व एक्टिवेशन प्रेशर पॉईंट मोकळे होतील त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होईल आणि यामुळे तुमच्या नसा मोकळ्या होतील, दबलेल्या, अडकलेल्या नसा सुटतील. हा उपाय तुम्ही रोज करा (दहा ते वीस मिनिटं) पाण्यात पाय घातलेले बाहेर काढल्या नंतर पाय स्वच्छ पुसून घ्या आणि पायांना खोबरेल तेल, तिळाचे तेल, मोहरीचे तेल असे जे कोणते तेल तुमच्या घरी उपलब्ध असेल त्या तेलाने मॉलिश करा. तेल मुरल्यानंतर पायात सॉक्स घाला आणि रात्रभर तसेच झोपा हा उपाय तुम्ही सलग पंधरा दिवस केला तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.
तिळाच्या तेलामध्ये लिनोलेइक अॅसिड हे ओमेगा ६ फॅटी अॅसिड आढळते. यामुळे रक्तातील बॅड कोलेस्ट्रेरॉल कमी होते आणि आवश्यक कोलेस्ट्रेरॉल वाढते. तसेच यामध्ये मॅग्नेशियम,सेलेनियम आणि कॅल्शियम आढळते. यामुळे हृद्याचे स्नायू बळकट होतात. नियमित तीळाच्या तेलाने मसाज केल्याने हाडांचे आरोग्य सुधारते. वाढत्या वयानुसार ते ठिसूळ होण्याचे प्रमाणही कमी होते. तुमच्या शरीरातील दबलेल्या नसा मोकळ्या होतील, सांधेदुखी-गुडघेदुखी कमी झालेली दिसेल, ब्लड सर्कुलेशन चांगले झाल्यामुळे वेदना कमी होतील. यासाठी तुम्हाला कोणतीही महागडी गोष्ट लागणार नाही, सर्व गोष्टी बाजारात सहजपणे उपलब्ध होतात. सहज साधा उपाय आहे तुम्ही नक्की करा. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
Published on: 19 May 2022, 03:31 IST