खराब कोलेस्ट्रॉलमुळे हृदयरोग किंवा स्ट्रोकचा धोका होतो. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यावर भर देणे गरजेचे आहे. कोलेस्ट्रॉल स्तर वाढल्याने अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात.जसे की, आर्टरी ब्लॉकेज, स्टोक्स, हार्ट अटॅक आणि हृदयाचे इतर आजार.आपल्या शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं की, आपलं शरीर काही संकेत देतं. हे संकेत समजून घेऊन वेळीच ब्लड टेस्ट करावी आणि कोलेस्ट्रॉलच्या समस्येपासून सुटका मिळवावी. आज आम्ही तुम्हाला कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी ठेवण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत.
१) तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की हृदयासाठी लसूण चांगला असतो.ते खरंच आहे. लसूण हृदयासाठी चांगला असतो.कच्चा लसूण खाल्याने अधिक फायदा होतो.लसणाची एक कळी, आल्याचा एक तुकडा आणि अर्धा चमचा लिंबाचा रस एकत्र करा. हे मिश्रण रोज जेवणाआधी खाल्ल्याने जास्त फायदा होईल.२) दालचीनीचा वापर करूनही तुम्ही कोलेस्ट्रॉलचं वाढलेलं प्रमाण कमी करू शकता. एक चमचा दालचीनी आणि हर्बल त्रिकुटचा ( काळे मिरे, लवंग आणि सूंठाचं चूर्ण) एक चतुर्थांश भाग टाकून चहा करा. चहा तयार केल्यावर १० मिनिटे थंड होऊ द्या. नंतर यात एक चमचा मध मिश्रित करून दोनदा सेवन करा.
३) नियमितपणे रोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होता. सोबतच कोलेस्ट्रॉलही कमी केला जातो.आवळ्याचा शरीरावर अॅंटी-हायपरलिपिडेमिक, अॅंटी-एथेरोजेनिक आणि हायरोलिपिडेमिक प्रभाव होतात. हे शरीरासाठी हायपोलिपिडेमिक एजंटसारखं काम करतात आणि याने सीरममधील लिपिडचं प्रमाणही कमी केलं जातं.४) दररोज रिकाम्या पोटी कोमट पाण्यात मध टाकून प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होता. त्यातील महत्त्वाचा फायदा म्हणजे वजन कमी होण्यासोबतच कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही कंट्रोलमध्ये राहतं. याने शरीरातील चरबी कमी करून खराब कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रित करण्यात मदत मिळते.
Published on: 26 May 2022, 12:42 IST