Health

आपल्या संसारामध्ये वेगवेगळ्या भाड्यांचा वापर करता असतो, त्यामधे वेगवेगळ्या धातूंचा भांड्यांचा वापर करत असतो त्या वेगवेगळ्या धातूंच्या भांड्यांचा वेगवेगळे आरोग्यदायी फायदे आणि दुष्परिणाम आहेत ते आपण जाणून घेऊयात.

Updated on 17 May, 2022 11:27 AM IST

सोन्याची भांडी सोने हा एक उष्ण धातू आहे. सोन्यापासून बनवलेल्या भांड्यात जेवण तयार केल्याने आणि जेवल्याने शरीराचे आंतरिक आणि बाह्य दोन्ही हिस्से कठोर, बलवान, ताकदवान आणि मजबूत बनतात आणि त्याच्या सोबतच सोने डोळ्यांची दृष्टी सतेज करते.चांदीची भांडी चांदी हा एक शीतल धातू आहे, जी शरीराला आंतरिक थंडावा देते. शरीर शांत ठेवते. चांदीच्या भांड्यात जेवण तयार केल्याने आणि जेवल्याने मेंदू तल्लख होतो, डोळ्यांचे आरोग्य वाढते, दृष्टी वाढते आणि याशिवाय पित्तदोष, कफ आणि वायुदोष नियंत्रित राहतो.कांस्यची भांडी कांस्याच्या भांड्यात जेवल्याने बुद्धी तल्लख होते, रक्त शुद्ध होते, रक्तपित्त शांत राहते आणि भूक वाढते. परंतु कांस्याच्या भांड्यात आंबट वस्तू वाढू किंवा ठेवू नयेत,

कारण आंबट वस्तू या धातूच्या संपर्कात येताच हा धातू कळकतो (धातूची आंबट पदार्थांशी रासायनिक क्रिया होते) आणि विषारी होतो ज्यापासून शरीराला नुकसान पोचते. कांस्याच्या भांड्यात जेवण बनवल्याने ९७% पोषकतत्वं मिळतात व केवळ ३% पोषकतत्वंच नष्ट होतात.तांब्याची भांडी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने व्यक्ती रोगमुक्त होते, रक्त शुद्ध होते, स्मरणशक्ती तीव्र होते, लिव्हर संबंधी तक्रारी नाहीशा होतात, तांब्याचे पाणी शरीरातील विषारी घटक काढून टाकतात, म्हणूनच या भांड्यात ठेवलेले पाणी आरोग्यासाठी उत्तम असते. मात्र तांब्याच्या भांड्यातून दूध पिऊ नये, ते शरीराला नुकसानकारक असते.पितळेची भांडी पितळेच्या भांड्यात जेवण तयार केल्याने आणि जेवल्याने कृमी रोग, कफ आणि वायुरोग नाहीसा होतो. पितळेच्या भांड्यात जेवण बनवल्याने ९३% पोषकतत्वं मिळतात आणि केवळ ७% पोषकतत्वंच नष्ट होतात. मात्र पितळेच्या भांड्यांना कल्हई अवश्य करावी.

लोखंडाची भांडी लोखंडाच्या भांड्यात बनवलेले भोजन खाल्ल्याने शरीराची शक्ती वाढते, लोहतत्त्व शरीरात आवश्यक पोषण तत्त्व वाढवते. लोखंड अनेक रोगांना नाहीसे करते, पंडूरोग नाहीसा करते, शरीरात सूज आणि पिवळेपणा येऊ देत नाही, कामला रोगाला नाहीसे करते, आणि कावीळ दूर ठेवते. परंतु लोखंडाच्या भांड्यात जेवू नये कारण त्यामुळे बुद्धी कमी होते आणि मेंदूचा ऱ्हास होतो. लोखंडाच्या भांड्यातून दुध पिणे चांगले असते.स्टीलची भांडी स्टीलची भांडी कोणतेही नुकसान पोचवत नाहीत कारण गरम किंवा आम्ल, कशाशीही यांची रासायनिक क्रिया होत नाही. त्यामुळे कोणतेही नुकसान होत नाही. स्टीलच्या भांड्यात जेवण बनवल्याने आणि जेवल्याने श्सारीराला कोणताही फायदा होत नाही, तसेच नुकसान देखील होत नाही.एल्युमिनिअमची भांडी एल्युमिनिअम हे बॉक्साट पासून बनलेले असते. त्याच्या भांड्यात बनवलेले खाल्ल्याने शरीराला केवळ नुकसानच पोचते. हा धातू लोह आणि कॅल्शियम शोषून घेतो त्यामुळे त्यापासून बनलेले भांडे वापरता कामा नये.

त्यामुळे हाडे कमकुवत होतात, मानसिक आजार होतात, लिव्हर आणि नर्व्हस सिस्टीम ला नुकसान पोचते. याच्या सोबतच किडनी निकामी होणे, क्षयरोग, अस्थमा, मधुमेह यांसारखे गंभीर आजार होतात. एल्युमिनिअमच्या कुकर मध्ये जेवण शिजवल्याने ८७% पोषण तत्त्व नष्ट होतात.मातीची भांडी मातीच्या भांड्यात जेवण शिजवल्याने अशी पोषक तत्त्वे मिळतात ज्यामुळे प्रत्येक आजार आपल्यापासून दूर राहतात. ही गोष्ट आता आधुनिक विज्ञानाने देखील मान्य केली आहे की मातीच्या भांड्यात जेवण केल्याने शरीरातील अनेक प्रकारचे आजार बरे होतात. आयुर्वेदानुसार जर भोजन पौष्टिक आणि स्वादिष्ट बनवायचे असेल तर ते हळू हळू शिजवले पाहिजे. मातीच्या भांड्यात जेवण तयार होण्यासाठी वेळ थोडा जास्त लागतो, परंतु आरोग्याला त्यापासून पूर्ण लाभ होतो. दुध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी मातीची भांडी सर्वांत जास्त उपयुक्त आहेत. मातीच्या भांड्यात जेवण तयार केल्याने १००% पोषण तत्त्व मिळतात. आणि जर मातीच्या भांड्यात जेवले तर त्याचा वेगळा स्वाद देखील मिळतो.

English Summary: Learn the relationship between utensils and your health
Published on: 17 May 2022, 11:27 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)