आपण जर जेवणामध्ये दही खात असाल तर खूपच चांगले आहे कारण दही खाल्यामुळे आपल्या शरीरात ज्या समस्या आहेत त्या दूर होतात. दही हा घटक आपल्या शरीरासाठी पौष्टिक असल्यामुळे आपले आरोग्य तसेच सौंदर्य उत्तम प्रकारे राहते.
तुमच्या केसात जर कोंडा होत असेल किंवा तुमची त्वचा राठ असेल तर त्याला कोमल बनवण्याचे काम दही करत असते. तुम्ही जर दह्यात मीठ टाकून दही खाल्ले तर त्याचा फायदा तुमचे सौंदर्य वाढवण्यास होईल.
तापामध्ये दही खाणे -
जेव्हा आपल्याला ताप येतो त्यावेळी आपल्या तोंडाची चव जाते आणि तोंड कडू पडते त्यावेळी जर आहारात तुम्ही दही भात जर घेतला तर तुमच्या शरीराला ऊर्जा भेटेल तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि तुम्ही लवकर बरे सुद्धा व्हाल.
हेही वाचा:सर्दी खोकल्यावर विशेष गुणकारी उपाय आहे तुळस
हृदयरोग, उच्च रक्तदाब व फुफ्फुसाच्या आजारांवर गुणकारी :-
जर तुम्ही दही खात असाल तर तुम्ही खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट करत आहात कारण दह्यामध्ये हृदयरोग, उच्च रक्तदाब व फुफ्फुसाचे आजार होण्यापासून बचाव करण्याची क्षमता असते. तसेच जर तुम्हाला रात्री झोपेची समस्या असेल म्हणजेच झोप येत नसेल तर थोड्या प्रमाणात दही खावा म्हणजे तुम्हाला झोप लागेल.
आतड्यांचे रोगापासून सुटका :-
अमेरिकेमधील तज्ञांनी असे सांगितले आहे की तुम्ही जर नियमित आहारात दही खात असाल तर तुम्हाला आतड्या संबंधी कधीच रोग होणार नाहीत किंवा असेल तर तो लगेच बरा होतो. आपल्या शरीरात जर रक्ताची क्षमता कमी असेल किंवा तुम्हाला थकवा येत असेल तर तुम्ही नियमित आहारात दही खाल्ले पाहिजे.
वजन कमी करण्यास मदत :-
जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर दिवसातून एकदा तुम्ही दही भात खाल्ला पाहिजे त्यामुळे तुमचे वजन कमी होईल पण एवढे लक्षात ठेवा की थोड्या प्रमाणात दही भात खावा या व्यतिरिक तुम्हाला तुमचे वजन वाढवायचे असेल तर दह्यामध्ये बदाम टाकून खावा.
रोगप्रतिकारशक्ती वाढते:-
तुमच्या आहारात जर दह्याचा समावेश नसेल तर तुम्ही करा कारण दही खाल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि तुमचा वायरल इन्फेक्शन पासुन बचाव करते.
Published on: 29 June 2021, 11:58 IST