आपल्या अवतीभवती अश्या अनेक भाज्या आहेत परंतु त्याचे फायदे आपल्याला माहिती नाहीत. निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीराला पोषक वातावरण, पोषक आहार आणि व्यायाम खूप गरजेचा असतो. वेगवेगळ्या आजारांपासून आपल्याला वाचायचे असेल तर पोषक आहार घेतला पाहिजे.थंडीच्या दिवसांमध्ये शेवग्याची भाजी मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. तसेच या शेवग्याच्या शेंगा बऱ्याच वेळा सांबार मध्ये आपल्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात. शेवग्याची शेंगा तसेच शेवग्याच्या पानांची सुद्धा भाजी केली जाते. शेवग्याच्या शेंगमध्ये मोठ्या प्रमाणात मिनरल्स आणि प्रोटिन्स मोठ्या प्रमाणात आढळतात.
शेवग्याच्या शेंगा खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. शेवग्यामध्ये व्हिटॅमिस, लोह, कॅल्शियम,मिनरल्स आणि प्रोटिन्स मोठ्या प्रमाणात आढळतात.।आणि ही सर्व पोषक तत्वे आपल्या शरीराला उपयुक्त आणि फायदेशीर असतात.
शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे:-
1) शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. तसेच शेंगेत लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते.
2)शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहते.
3)नियमित सेवन केल्यामुळे शरीरातील कॅल्शियम चे प्रमाण वाढते आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते.
4)शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे शरीरातील थकवा दूर होतो.
5)शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे शरीरातील पचनक्रिया सुधारते.
6)शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे वजनावर नियंत्रण राहते.
7)शेवग्या ची पाने आणि नारळाच्या पाण्याचे मिश्रण करून पिल्यामुळे जुलाब आणि कावीळ यापासून सुटका होते.
8)ज्या लोकांना डायबिटीस आहे त्या लोकांसाठी शेवगा खूप फायदेशीर आहे. त्यासाठी आहारात शेवग्याच्या शेंगेचा वापर करावा.
9)शेवग्याच्या शेंगेत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पोषक तत्वे असतात.
10)शेवगयाची पानं, फुलं, फळं, बिया साल आणि मूळ यांचा उपयोग औषधनिर्मिती केला जातो.
11)पानांचा रस आणि मध मोतीबिंदू असलेल्या रोग्यांसाठी खूप फायदेशीर ठरतो.
12)शेवग्याचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.
Published on: 28 November 2021, 07:06 IST