Health

रोजच्या दैनंदिन जीवनातील आहारात आपण तुपाचा वापर करत असतो. अनेक वेगवेगळ्या पदार्थामध्ये तूप घालून आपण पदार्थाची रुची वाढवत असतो. तुपाचे अनेक फायदे आहेत. तूप खाणे हे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याला खूप फायदेशीर असते. आयुर्वेदामध्ये सुद्धा तुपाला मोठे स्थान आहे.बरेच लोक वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त असतात. त्यामधील एक सामायिक म्हणजे वजन न वाढणे आणि वजन वाढणे हे आहे. काही लोक वजन वाढावे म्हणून आहारात तुपाचा समावेश करतो. तर काही वजन कमी करण्यासाठी तुपाचा त्याग करतात.परंतु तुम्हाला माहितेय का? तुपाचे सुद्धा दोन प्रकार आहेत. एक म्हणजे पिवळ तूप आणि दुसरं म्हणजे पांढर तूप. पांढर तूप बनवण्यासाठी म्हशीच्या दुधाचा वापर केला जातो तर पिवळे तूप तयार करण्यासाठी गाई च्या दुधाचा वापर केला जातो.

Updated on 02 December, 2021 6:10 PM IST

पांढरे म्हशीचे तूप:-

देशी तुपामध्ये मुबलक प्रमाणात  प्रथिने, व्हिटॅमिन  ए, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के असतात. तसेच देशी तूप आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. देशी तुपाचा वापर केल्यामुळे तुमची त्वचा, केस, पचन आणि हृदयाचे आरोग्य  चांगले  आणि  निरोगी राहते.गाई च्या तुपाच्या प्रमाणात म्हशीच्या तुपात फॅट ची प्रमाण जास्त असते. म्हशीचे तूप आपण दीर्घकाळ साठवू शकतो.म्हैशीच्या तुपाचे  सेवन  केल्यामुळे हाडे  मजबूत होतात वजन वाढण्यास मदत  होते आणि  हृदयाच्या   स्नायूंच्या क्रिया वाढविण्यास फायदेशीर असते. पांढऱ्या तुपामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखी शरीरास आवश्यक असणारी पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात.

जर का आपल्याला सर्दी किंवा खोकला आला तर म्हशीच्या तुपाचे सेवन करावे कारण म्हशीच्या तुपात अधिक प्रमाणात कॅलरीज असतात. म्हशीच्या तुपात(ghee) अँटीएजिंग एजंट गुणधर्म असल्यामुळे व्हायरल इन्फेकॅशन पासून आपले संरक्षण होते.जर का तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला गाई(cow)च्या तुपाचे सेवन करणे गरजेचे आहे. गाईच्या तुपामध्ये A2 नावाचे प्रोटिन्स असते. गाई चे तूप हे ह्रदय आजार असलेल्या व्यक्तीसाठी खूप फायदेशीर असते. सोबतच गाई च्या तुपामध्ये प्रथिने, खनिजे, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात.

तसेच दिवसातून एकदा गाई च्या तुपात भात (rice) खाल्ल्यामुळे डायबिटीस सारखे आजार नाहीसे होतात. त्यामुळे आपल्या शरीरासाठी गाई चे आणि म्हैशीचे तूप सुद्धा खूप उपयुक्त आहे. तज्ज्ञांच्या मते म्हैशीच्या तुपापेक्षा गाई चे तूप अधिक पोषक असते. कारण गाई च्या तुपात कॅरोटीन, व्हिटॅमिन ए असते, जे डोळे आणि आपल्या मेंदूसाठी खूप फायदेशीर असते

English Summary: Learn the difference between cow ghee and buffalo ghee and its benefits
Published on: 02 December 2021, 06:10 IST