तर trans fat आणि saturated fat हे हृदय विकार आणि बऱ्याच आजाराची साठी कारणीभूत असतात.ट्रान्स फॅट मांस आणि दुधासारख्या खाद्यपदार्थांमध्ये ट्रान्स फॅटची थोड्या प्रमाणात असते. परंतु बहुतेक ट्रान्स फॅट्स औद्योगिक प्रक्रियेत पदार्थ बनवताना बनतात. वनस्पती तेलात हायड्रोजन घालतात. ट्रान्स फॅट अन्न जास्त काळ टिकण्यास मदत करते. पण ते शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतात. हे पदार्थांना एक समाधानकारक चव देते.
ट्रान्स फॅट कशात असते?
फ्रेंच फ्राईज आणि इतर तळलेले पदार्थ,केक्स, पाई, बिस्किटे, कुकीज, डोनट्स आणि इतर भाजलेले पदार्थ,स्टिक किंवा टब मार्जरीन,मायक्रोवेव्ह मधील पदार्थ ,पॉपकॉर्न,गोठलेला पिझ्झा इत्यादी
Saturated fat
संतृप्त चरबीयुक्त आहार कोलेस्ट्रॉल वाढवू शकतो आणि अधिक हानीकारक LDL कोलेस्ट्रॉल ज्यामुळे हृदयात आणि शरीरात इतरत्र रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होते. LDL कोलेस्ट्रॉलमुळे हृदयरोगाचा धोका वाढतो.संतृप्त फॅट देखील थोड्या प्रमाणात शरीरास आवश्यक असते.
saturated fat कशात आढळतो.
डूकराचे मांस,चिकन आणि इतर पोल्ट्री आणि अंडी जास्त प्रमाणात असते.दूध, लोणी,चीज आणि आइस्क्रीम सारख्या संपूर्ण दुधाच्या पदार्थात कमी अधिक प्रमाणात आढळते.पाम तेल आणि नारळ तेल
Unsaturated fat
असंतृप्त चरबी आपल्या हृदयासाठी आणि आपल्या उर्वरित शरीरासाठी चांगले आहेत, तज्ञ शिफारस करतात की आपण ते संतृप्त आणि ट्रान्स फॅटच्या जागी असंतृप्त चरबी आहारात घ्यावी.
Unsaturated fat कशात आढळते.
असंतृप्त चरबी प्रामुख्याने भाज्या, शेंगदाणे आणि मासे या मध्ये असते.वनस्पतींचे पदार्थ, जसे की तेलबिया आणि अक्रोड,काजू, जवस, मका, सोयाबीन आणि सूर्यफूल तेल व मासे इ.
Nutritionist & Dietician
Naturopathist
Dr. Amit Bhorkar
whats app: 9673797495
Published on: 03 May 2022, 07:03 IST