Health

रताळे,बटाटा, गाजर, मुळा हे कंदफळ प्रकारचा भाजीपाला आहे. रताळे बटाटा गाजर मुळा यांमध्ये फायबर चे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून येते. झटपट वजन कमी करण्यासाठी डॉक्टर रताळे खाण्याचा सल्ला देत असतात. रताळामध्ये खनिजे, जीवनसत्त्वे आणि फायटोन्यूट्रिएंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. तसेच रताळामध्ये पिष्टमय पदार्थ म्हणजे प्रोटिन्स चे प्रणाम जास्त असते त्यामुळे आपले शरीर निरोगी राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढण्यास मदत होते.

Updated on 16 February, 2022 12:21 PM IST

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर:-

जर का आपल्याला वजन कमी करायचे असेल तर डॉक्टर आपल्याला रताळाचे सेवन करण्याचा सल्ला देतात. कारण रताळामध्ये व्हिटॅमिन ए चे प्रमाण जास्त असते सोबत फायबर सुद्धा मोठ्या प्रमाणात असल्याने रताळे खाल्ल्यावर आपली भूक शमवते आणि आपले वजन कमी किंवा नियंत्रणात राहण्यास सुरुवात होते.

शरीरातील कॅलरी कमी करण्यासाठी फायदेशीर:-

रताळात कॅलरी चे प्रमाण खूप कमी प्रमाणात असते. 100 ग्राम रताळामध्ये 86 कॅलरी असतात. त्यामुळे आपले वजन नियंत्रित राहते शिवाय शरीरातील कॅलरी कमी करण्यासाठी रताळाचे सेवन फायदेशीर ठरते.

रक्तातील साखर नियंत्रित राखते:-

रताळात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अधिक जास्त प्रमाणात असते, परंतु ते अॅडिपोनेक्टिन प्रदान करतात, ज्यामुळे आपल्या शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते शिवाय आपले हृदय सुद्धा निरोगी ठेवण्यास मदत करते.

प्रोटिन्स चा साठा:-

रताळामध्ये प्रोटिन्स चा मुबलक साठा असतो त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. रताळे खाल्ल्याने आपल्या शरीरातील मसल मजबूत होतात शिवाय आपले वजन सुद्धा वाढवण्यास पूरक असतात. तसेच आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढण्यास मदत होते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते:-

रताळामध्ये अनेक पोषक तत्वे आढळून येतात यामध्ये फायबर, खनिजे आणि विविध जीवनसत्त्वे जे की आपल्या आरोग्याला जास्त फायदेशीर असतात. त्यामुळे मुबलक जीवनसत्त्वे मिळाल्यामुळे आपले शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते शिवाय आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढून अनेक आजारांपासून आपला बचाव होतो.

डोळ्यांसाठी फायदेशीर:-

रताळामध्ये बीटा केरोटीन आढळून येते. म्हणून रताळाचे सेवन केल्यावर तुमच्या डोळ्यांना बीटा केरोटीन मिळते आणि डोळ्यासंबंधीत असलेले आजार नाहीसे होतात. तसेच हृद्यविकारापासून बचाव करायचा असेल तर रताळाचे सेवन खूप गरजेचे आहे.

English Summary: Learn about the tremendous health benefits of eating sweet potato
Published on: 16 February 2022, 12:19 IST