Health

सर्वसाधारणपणे ओव्याचा वापर स्वयंपाकामध्ये एखाद्या पदार्थाचा स्वाद वाढविण्यासाठी केला जातो.

Updated on 20 May, 2022 4:23 PM IST

मात्र याव्यतिरिक्त पण ओवा खाण्याचे अनेक फायदे आहे. पचनाच्या विकारांप्रमाणेच अन्य काही आजारांवरदेखील ओवा उपयुक्त आहे. त्याबाबत जाणून घेऊयात.1) पोटाशी संबंधित अनेक विकारांमध्ये ओवा गुणकारी असल्याने त्याचे सेवन केल्यास पोटदुखी, गॅसेस, उलट्या होणे, आम्लपित्त, या विकारांमध्ये आराम मिळतो.2) पोटाशी संबंधित विकारांवर ओव्याचे सेवन करण्याकरिता ओवा, काळे मीठ, आणि सुंठ एकत्र करून त्याची पावडर करावी.

हे चूर्ण घेतल्याने पित्त आणि उलट्यांच्या त्रासामध्ये लगेच गुण दिसून येतो.3) अपचन झाले असेल, तर ओवा थोडा तव्यावर शेकून घेऊन चावून खावा. त्याने अपचन दूर होण्यास मदत होईल.4) वजन घटविण्यासाठी देखील ओवा उपयुक्त आहे. ओवा घालून ठेवलेले पाणी प्याल्याने शरीराची चयापचय शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे शरीरातील चरबी घटू लागते.5) सतत खोकला येत असेल, तर ओव्याचे पाणी त्यावर अतिशय गुणकारी आहे. यासाठी पाण्यामध्ये ओवा घालून हे पाणी उकळून घ्यावे. 

थोडे थंड झाल्यावर पाण्यात थोडेसे काळे मीठ घालून त्याचे सेवन करावे.6) जर सतत गुडघे दुखत असतील, तर ओवा गरम करावा, व एका रुमालात बांधून घेऊन, त्या पुरचुंडीने गुडघ्यांना शेक घ्यावा. 7) अर्धा कप ओव्याच्या पाण्यामध्ये सुंठीची पूड घालून या पाण्याचे सेवन केल्याने ही सांधेदुखीमध्ये आराम पडतो.8) कधी इन्फेक्शनमुळे हिरड्यांना सूज येते, अशावेळी ओव्याच्या तेलाचे काही थेंब कोमट पाण्यामध्ये घालून,

या पाण्याने गुळण्या केल्यास हिरड्यांची सूज कमी होण्यास मदत होते.9) काही महिलांना मासिक पाळीच्या वेळी कंबरदुखी आणि पोटदुखीचा अतिशय त्रास होतो. अश्या वेळी थोडासा ओवा, गरम पाण्याबरोबर घेतल्याने कंबरदुखी आणि पोटदुखी कमी होते.10) चेहऱ्यावर सतत मुरुमे पुटकुळ्या येत असतील, त्यांनी ओव्याची पूड करून घेऊन, ही पूड दह्यामध्ये मिसळावी, व चेहऱ्यावर लावावी. काही दिवसातच चेहऱ्यावर मुरूमे येणे बंद होईल.

English Summary: Learn about the health benefits of ova
Published on: 20 May 2022, 04:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)