आपल्या दैनंदिनी जीवनात तसेच रोजच्या आहारात कांद्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. जेवण बनवताना कांद्याचा वापर मसाल्याचा पदार्थ म्हणून केला जातो. कांद्यामध्ये अनेक असे औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आणि फायदेशीर असतात. कांदा खाल्ल्याने आपल्या शरीराला काही फायदे तसेच काही तोटे सुद्धा होतात. महाराष्ट्र थाळीमध्ये कांद्याला खूप महत्व प्राप्त झाले आहे.
1) हृदयाचे आरोग्य सुधारते:-लाल रंगाचा कांद्यामध्ये फ्लेव्होनॉईड या नावाचा घटक सापडतो. तो घटक आपल्या आपल्या हृदयाला निरोगी ठेवत असतो. याचबरोबर कांद्यामध्ये सल्फर चे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळते त्यामुळे कांद्याचे सेवन केल्यामुळे हृदयविकाराचा धोका टळतो आणि आपल्या हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
2)रक्तामधील साखरेवर नियंत्रण राहते:- आजकाल आपल्या आजूबाजूला अनेक मधुमेहाचे लोक आढळतात आणि दिवसेंदिवस ही संख्या वाढतच चालली आहे. जर का तुम्ही कांद्याचे सेवन केले तर तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते. कांदा खाणे हा मधुमेह साठी एक घरगुती उपाय आहे.
3)पचनक्रिया व्यवस्थित राहते:- कांद्यामध्ये फायबर चे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे कांद्याचे सेवन आपल्या पचनक्रियेसाठी खूप फायदेशीर ठरते आहे. कांदा खाल्ल्याने आपल्या लहान आतड्यात बॅक्टरीया तयार होतो आणि ते आपल्या पोटातील अन्न व्यवस्थित पणे पचवत.
4)हाडे मजबूत होतात:- कांद्याचे सेवन केल्यामुळे आपली हाडे मजबूत होतात. शिवाय दातांचे आरोग्य सुद्धा व्यवस्थित राहते. तसेच कांद्याचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील हाडांची झीज कमी प्रमाणात होते. तसेच सांधेदुखीचा आजार असल्यास कांद्याचे सेवन फायदेशीर ठरते.
5)शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत:- कांद्याचे नियमित सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते तसेच कांद्यामध्ये सेलेनियम मुबलक प्रमाणात असल्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि वेगवेगळ्या आजारांपासून आपले संरक्षण होण्यास मदत होते.
6) लैंगिक जीवन सुधारते:- कांदा खाल्ल्याने आपले लैंगिक जीवन एकदम सुरळीत राहते. तसेच कांदा हा एक आयुर्वेदाचाच भाग आहे. तसेच कांद्याचे सेवन केल्यामुळे पुरूषांमधील नपूसंकता आणि इतर खाजगी शारीरिक समस्या दूर होण्यास मदत होते.
Published on: 11 February 2022, 11:41 IST