Health

लसणाचा वापर प्रत्येक घरात केला जातो भाजीमध्ये लसूण वापरतात हे अन्नाची चव वाढविण्याचे काम करतो.

Updated on 30 March, 2022 6:02 PM IST

लसणाचा वापर प्रत्येक घरात केला जातो भाजीमध्ये लसूण वापरतात हे अन्नाची चव वाढविण्याचे काम करतो. हे आरोग्याला आणि त्वचे ला आणि केसांना फायदा देतो. ह्याची साले देखील निरुपयोगी म्हणून टाकून देतो हे खूप कमी येतात. ह्याचा वापर सौंदर्य वाढविण्यासाठी केला जातो. ह्याच्या साली मध्ये अँटी बॅक्टेरियल, अँटी व्हायरल आणि अँटी फंगल गुणधर्म असतात.

तर मग ह्याच्या सालीचे फायदे जाणून घेऊ या.

स्नायूंच्या पिळीपासून आराम मिळते-

जर आपल्याला स्नायूंची वेदना आणि पीळ येण्याच्या त्रासामुळे त्रस्त असाल तर लसूणाचे साल चांगल्या प्रकारे धुऊन 10 ते 20 मिनिटे उकळवून घ्या. स्नायूंच्या पिळी पासून आराम मिळेल.

त्वचे ची खाज कमी करते-

त्वचेच्या खाज पासून त्रस्त आहात तर लसूण चे अँटी फंगल गुणधर्म त्वचे वरील खाज होण्याच्या त्रासापासून आराम देते.या साठी त्वचेवर लसणाच्या सालीचे पाणी लावा.

वनस्पतींसाठी नैसर्गिक खत –

या मध्ये असलेले पोषक घटक झाडाची वाढ करण्यास आणि त्यांना निरोगी ठेवण्यात सक्षम आहे.

त्वचे साठी चांगले-

त्वचेच्या कोणत्याही समस्या साठी लसणाच्या सालीची पेस्ट बनवा आणि त्वचेवर लावा आपल्या अँटी बेक्टेरियल गुणधर्माने समृद्ध असल्यामुळे लसूणाची साले पुरळ, मुरूम काढण्यात मदत करते. मुरूम असल्यास लसणाचे साल वाटून लावा.

केसांसाठी चांगले-

लसणाच्या साली पाण्यात उकळवून केसांमध्ये वापरावे. केसांच्या सर्व समस्या दूर होतात.साली वाटून या मध्ये ऑलिव्ह तेल मिसळून लावल्याने केसांवर चमक येते केसांचा कोंडा कमी करण्यासाठी सालीं मध्ये लिंबू मिसळून मुळात मसाज करा.

पायांची सूज कमी करण्यासाठी –

लसणाच्या साली घालून पाणी उकळवून घ्या आणि त्या पाण्यात पाय घालून बसा असं केल्याने पायावरची सूज नाहीशी होते.

सर्दी पडसं कमी करण्यात –

लसणाच्या साली पाण्यात उकळवून घ्या आणि हे पाणी प्यावं. असं केल्याने सर्दी पडसं पासून त्वरितच आराम मिळेल.

भाजलेल्या लसूण पासून मिळतात भरपूर लाभ

लसूण तर सर्वांनाच माहिती आहे. स्वयंपाक करताना भाजी किंवा डाळीला तडका देण्यासाठी गृहिणी लसणाचा वापर करतात. लसणाची चटणीसुद्धा बनवली जाते. लसूण खाण्याने हृदय मजबूत होते. याशिवाय त्याच्यामध्ये असे अनेक औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे आरोग्य चांगले राहू शकते. अनेक आजारांवर गुणकारी असलेला लसूण पुरूषांसाठी तर खुपच लाभदायक आहे. लसूण खाण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.

1 पुरूषांचीसेक्स लाईफ

 लसणामध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढविण्याचा गुण हे हार्मोन्स पुरूषांची सेक्स लाईफ सुधारतात. सेक्स पावर वाढते.

2. हृदयाची मजबूती

लसणात ओमेगा 3 फॅटी अॅसिड आढळते. यामुळे हृदय मजबूत होते. हृदयविकाराची शक्यता कमी होते.

3. सर्दी, खोकला, ताप

लसणू खाल्ल्याने सर्दी, खोकला आणि ताप दूर होतो लसणात अँटीबायोटीक, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुण असतात. हे वायरल आजार दूर राहतात. यासाठी लसूण थोडासा भाजून खाऊ शकता.

4. फिटनेस

फिटनेस चांगला ठेवायचा असेल तर रोज सकाळी रिकाम्यापोटी एक लसूण पाकळी चावून खा आणि त्यानंतर एक छोटा ग्लास कोमट पाणी प्या. काही दिवसात तुम्हाला फरक दिसून येईल. यामुळे दिवसभर अॅक्टिव्ह कराल आणि फिटनेससुद्धा मजबूत होईल.

5. पचनक्रिया

पचनक्रिया वाढविण्यासाठी लसूण रामबाण औषध आहे कारण लसणात भरपूर फायबर असते. ज्यामुळे पचनशक्ती वाढते.

English Summary: Learn about the benefits of garlic peel, as well as the benefits of eating garlic
Published on: 30 March 2022, 05:55 IST