आपल्या आहारामध्ये ब्रोकोली भाजी असणे आपल्या शरीरासाठी आरोग्यदायक आहे. ब्रोकोली भाजी खायला सुद्धा स्वादिष्ट आणि पौष्टिक आहे. ब्रोकोली भाजीमध्ये सी आणि के जीवनसत्त्व चांगल्या प्रमाणत आहे. एवढेच काय तर ब्रोकोली भाजीमध्ये फॉलिक ऍसिड, पोटॅशियम तसेच फायबर चे प्रमाण देखील सुद्धा प्रचंड प्रमाणात आहे. आपल्याला शरीराला जेवढ्या प्रमाणत पौष्टिक जीवनसत्त्व आहेत ते आपणास ब्रोकोली भाजीमधून मिळते. ब्रोकोली भाजीमध्ये सी व्हिटॅमिन असते ते आपल्या शरीरात कोलेजन तयार करते जे की यामुळे आपल्या शरीरात जे विषारी पदार्थ असतात ते बाहेर टाकण्यास मदत होते. आपल्या शरीरावर ज्या जखमा आहेत त्या नीट होण्यास मदत होते तसेच हाडांच्या निर्मितीसाठी सुद्धा ब्रोकोली भाजी फायद्याची आहे.
ब्रोकोलीचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या
१. कर्करोग प्रतिबंधित करते :-
आपल्या आहारात नियमित ब्रोकोली भाजी असणे आवश्यक असते. जे की कॅन्सरला जे लढा देण्यासाठी रोगप्रतिकारक गुणधर्म असतात ते गुणधर्म ब्रोकोली भाजीमध्ये असतात. आपल्या शरीरामध्ये इस्ट्रोजेन असते ज्यामुळे आपल्याला कॅन्सर उदभवतो तेच इस्ट्रोजेन नष्ट करण्यासाठी ब्रोकोलो भाजी फायदेशीर ठरते. ब्रोकोली भाजी आपल्या शरीरात असणारा स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचा नीट करण्यास मदत करते.
२. हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य :-
आपले हृदयनिरोगी होण्यासाठी ब्रोकोली भाजी फायदेशीर ठरते. ब्रोकोली भाजीमध्ये फायबर, फॅटी ऍसिड तसेच विविध जीवनसत्त्वे असतात त्यामुळे आपल्या शरीरातील रक्तदाब सुद्धा नियंत्रणात राहण्यास मदत होते तसेच शरीरात असणारे खराब कोलेस्ट्रॉल बाहेर टाकण्यास मदत होते. आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या सुरक्षित ठेवण्यासाठी ब्रोकोली भाजीचा फायदा होतो.
३. एलर्जी आणि सूज कमी करण्यासाठी मदतशीर :-
ब्रोकोली भाजी आपल्या शरीरात एनर्जी तयार करण्यासाठी उपयुक्त ठरते तसेच शरीरातील कोणत्या भागावर सूज असेल तर ती कमी करण्यासाठी सुद्धा ब्रोकोली भाजीचा फायदा होतो. ओमेगा ३ फॅटी ऍसिड ब्रोकोली भाजीत असते ज्यांना अँटी-इंफ्लेमेटरी असे म्हणतात. अँटी-इंफ्लेमेटरी हे संधिवात होण्यापासून वाचवते कारण यामध्ये सल्फोराफेन एंजाइम असते. शरीरातील हाडे मजबूत करण्यासाठी ब्रोकोली भाजी उपयुक्त ठरते.
४. हाडांची मजबूती :-
ब्रोकोली भाजीत प्रचंड प्रमाणात व्हिटॅमिन आणि कॅल्शियम चे प्रमाण असते ज्यामुळे आपल्या शरीरात असणारी हाडे मजबूत होतात तसेच ऑस्टिओपोरोसिसपासून आपला बचाव होतो. तरुण वयात असणारी मुले तसेच वृद्ध वयात असणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा ब्रोकोली भाजी खावी. ब्रोकोलो भाजीत कॅल्शियम तर असतेच त्यासोबत मॅग्नेशियम, झिंक आणि फॉस्फरस सारखे पोषक घटक सुद्धा असतात.
५. प्रदूषणापासून बचाव करते :-
आपल्या शरीरात जे खराब वायू आहेत ते बाहेर टाकण्यासाठी ब्रोकोली भाजीचा फायदा ठरतो. प्लांट कंपाऊंड सल्फोराफेन हा घटक ब्रोकोली भाजीत आढळतो ज्यामुळे कर्करोग बरा होतो तसेच आपल्या शरीरातून खराब वायू बाहेर टाकतो.
Published on: 28 January 2022, 04:25 IST