1) सांधेदुखी चा त्रास असल्यास दोन चमचे बडीशोप व सुंठीचे तुकडा चार कप पाण्यामध्ये घालून एक कप राहील तो पर्यंत उकळावे व अर्धा चमचा एरंडेल तेल घालून घ्यावे. याप्रमाणे महिना भर केल्यास सांधेदुखीचा त्रास कमी होईल.2) दोन चमचे सुंठ व दोन चमचे एरंदमुळाची भरड चार कप पाण्यात उकळावे व एक कप पाणी राहिल्यावर गळून घ्यावे. व पिऊन घ्यावे. हा काढा नियमित घेतल्यास सांधेदुखी मध्ये निश्चित आराम मिळेल.
3) निर्गुडीची पाने पाण्यामध्ये उकळून त्याच्या वाफेने सांधा शेकल्यास सुज व वेदना कमी होतात.4) मूठभर ओवा एरंडतेल तव्यावर गरम करून सुती कापडात बांधून पोटली करावी व त्याने दुखणारा सांधा शेकावा.5) एरंडची पाने वाफवून कुटून दुखत असलेल्या सांध्यावर बांधावे.
6) रोजची कनिक मळताना चमचाभर एरंड तेलाचे मोहन घालून केलेली पोळी किंवा फुलका खावा. याने सांधेदुखीचा व सर्व सांधे संबंधित समस्या दूर होतात.7) सांधे दुखत असल्यास मेथीचे व डिंकाचे लाडू नियमित खाल्ल्यास फायदा होतो.रात्री उशिरा भरपेट जेवण करू नये, वजन जास्त असल्यास कमी करावे,
नियमित योगासने करावी, व सकाळी चालायला जावे. असे केल्यास सांधे दुखीचा त्रास होत नाही.तीळ व आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेले तेल नियमित लावल्यास व आहारामध्ये योग्य प्रमाणात साजूक तूप समाविष्ट केल्यास शरीराचे स्नेहन होऊन सांधेदुखी कमी होते.
Nutritionist & Dietitian
Naturopathist
Dr. Amit Bhorkar
whats app: 7218332218
Published on: 08 May 2022, 07:31 IST