आपण आपल्या दैनंदिन आहारात अनेक वेळा मसाल्याच्या पदार्थाचा वापर मोठ्या प्रमाणात करत असतो त्यामधील म्हणजे कांदा, लसूण, आले आणि पुदिना या पदार्थांचा वापर आपण मसाले म्हणून आपल्या जेवणात करत असतो. पुदिना आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गुणी आणि परोपकारी आहे. पुदिण्यामध्ये अनेक पोषक घटक आहेत जे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदशीर असतात. पुदिना खाल्ल्यामुळे आपले अनेक आजार बरे होतात. प्राचीन काळापासून पुदिन्याला औषधी वनस्पती म्हणून ओळखले जाते शिवाय पुदिण्यात अनेक औषधी गुणधर्म सुद्धा आहेत.
पोटदुखी पासून सुटका:-
पोटासंबंधित विकारासाठी पुदिना खूप गुणकारी आहे शिवाय जर तुम्हाला मळमळ करत असेल तर किंवा उलट्या होत असतील तर पुदिन्याचे सेवन करावे.
डोकेदुखी वर जालीम उपाय:-
पुदिन्यात मेन्थॉल असते. पुदिन्याच्या गुणधर्मांवरील अभ्यासातून असे दिसून आले आहे की, ते मायग्रेन डोकेदुखीमध्ये देखील आराम देते. पुदिन्याच्या तेलाने कपाळाला मसाज केल्याने तीव्र वेदनांमध्येही आराम मिळतो.
तोंडातील जंतू नष्ट करण्यासाठी:-
पुदिन्याचा वापर माऊथ फ्रेशनर साठी केवळ नाही तर तोंडातील जंतू नष्ट करण्यासाठी सुद्धा केला जातो. तसेच दात चमकदार आणि मजबूत सुद्धा राहतात.
कफ पासून कायमची सुटका:-
बदलत्या आणि खराब वातावरण यामुळे आपली तब्येत सारखी बिघडत असते, वायरल इन्फेक्शन, कफ सर्दी खोकला यांचा त्रास जास्त होतो. त्यामुळे बदलत्या हवामानात पुदिन्याचे सेवन करणे खूप गरजेचे आहे.
वजन कमी करण्यास फायदेशीर:-
शास्त्रज्ञ पेपरमिंटवर सतत संशोधन करत असतात. शास्त्रज्ञांच्या मते पेपर मिंट चे सेवन केल्यामुळे आपली भूक मंदावते त्यामुळे जर का तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर पेपरमिंट चे सेवन करू शकता.
ऊर्जा वाढवते :-
जेव्हा तुम्हाला जास्त वेळ काम करावे लागते आणि तुम्हाला थकवा जाणवत असेल तेव्हा पेपरमिंटचा वास घ्या. त्यामुळे तुमची उर्जा वाढते. शिवाय मन प्रसन्न राहण्यास मदत होते.
Published on: 17 September 2022, 11:51 IST