आरोग्य आणि आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी शरीराला पोषक आहाराची आवश्यकता असते. पोषक आहारामध्ये आपल्याला दैनंदिन आहारात फळांचा समावेश करणे खूप गरजेचे आहे.भूक शमवीण्यासाठी केळी हे फळ खूप उपयुक्त ठरते. केळी मध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वे आढळून येतात त्यामध्ये थायमिन, रिबोफ्लेबिन, नियासिन, फॉलिक acid ही तत्वे आढळून येतात. ही पोषक तत्वे आपल्या आहारासाठी खूपच फायदेशीर असतात. त्यामुळं केळी चे सेवन करणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.
केळी खाल्ल्याने शरीरास होणारे फायदे:-
1) जर का आपण 2 केळी चे सेवन केले तर तिथून पुढे आपल्याला व आपल्या शरीराला 90 मिनिटे ऊर्जा मिळते. जिम करण्याच्या आधी अर्धा तास केळीचे सेवन करावे.
2)जर का आपल्यावर जास्त प्रमाणात ताण तणाव किंवा टेंशन असल्यास केळीचे सेवन करावे. सेवन केल्याने ताण कमी होऊन शरीरास आराम मिळतो.
3)ज्या व्यक्तीला रक्तदाब चा त्रास असेल अश्या व्यक्तींनी केळीचे सेवन दररोज करावे.
4) अशक्त व्यक्ती किंवा कमजोर शरीर असलेल्या व्यक्तींसाठी केळी खूपच आवश्यक आहे.
5)दररोज केळीे चे सेवन केल्यास आपल्या शरीरातील हाडे मजबूत होतात. तसेच केळ्यातील प्रोबायोटिक बॅक्टेरिया खाण्यातील कॅल्शियम शोषून घेते. यामुळे आपली हाडे मजबूत होतात.
6)दररोज केळी खाल्ल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन चे प्रमाण वाढते.
7)वजन वाढवायचे असेल तर दररोज केळीचे सेवन करणे आवश्यक आहे.
8) डायरिया सारख्या आजाराव केळी खाणे खूप आवश्यक आणि फायदेशीर आहे.
9)केळीमध्ये असलेल्या ट्रायफोटोपणमूळे आपला मेंदू शांत राहतो. त्यामुळे शरीरावरचा ताणतणाव कमी होऊन शरीराला आराम मिळतो.
10)दररोज केळी चे सेवन केल्याने आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते.
11)दररोज २ केळी आणि मध खाल्याने हृदया संबंधित असलेले आजार नाहीसे होतात.
12)जर का केळीच्या सालीची पेस्ट करून आपण डोक्याला लावली तर डोकेदुखी पासून आपली सुटका होते.
Published on: 23 November 2021, 04:24 IST