Health

अनेकजण नारळ पाणी देखील पितात, नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत, मात्र ते कोणत्या वेळी घेतले पाहिजे हे आपल्याला माहिती पाहिजे. डिहायड्रेशन (Dehydration) टाळण्यासाठी उन्हाळ्यात स्वत:ला हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे आहे. या ऋतूत नारळ पाणी (Coconut water) प्यायल्याने तुम्हाला बरेच फायदे होतात.

Updated on 04 July, 2022 10:37 AM IST

अनेकजण सकाळी उठल्यानंतर व्यायाम करत असतात, व्यायामाचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत. यामुळे आपले शरीर देखील चांगले राहते. असे असताना अनेकजण नारळ पाणी देखील पितात, नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत, मात्र ते कोणत्या वेळी घेतले पाहिजे हे आपल्याला माहिती पाहिजे. डिहायड्रेशन (Dehydration) टाळण्यासाठी उन्हाळ्यात स्वत:ला हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे आहे. या ऋतूत नारळ पाणी (Coconut water) प्यायल्याने तुम्हाला बरेच फायदे होतात.

उष्णता कमी करण्यासाठी तसेच शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी नारळाचे पाणी खूप फायदेशीर मानले जाते. नारळ पाण्याचे योग्य वेळी सेवन केल्याने त्याचे फायदे दुप्पट होतात. तुम्ही कधीही नारळाचे पाणी सेवन करू शकता. तुम्ही ते दिवसा किंवा रात्री देखील पिऊ शकता. पण ठराविक वेळी ते प्यायल्याने त्याचे फायदे जास्तच होतात. सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाण्याचे सेवन (Consumption of coconut water on an empty stomach) केल्याने अनेक फायदे मिळू शकतात.

यामध्ये लॉरिक ऍसिड आढळते, जे रोगप्रतिकार शक्ती (Immunity) वाढवते तसेच वजन कमी करण्यास देखील मदत करते. यामुळे तुम्ही याचे सेवन रोज करू शकता. तसेच याचे सेवन गर्भवती महिलांसाठीही खूप फायदेशीर ठरू शकते. यामुळे डिहायड्रेशन आणि बद्धकोष्ठता, तसेच मॉर्निंग सिकनेस आणि छातीत जळजळ यापासून सुटका मिळते. व्यायामानंतर, नारळाचे पाणी तीव्र व्यायामानंतर गमावलेले इलेक्ट्रोलाइट्स पुनर्संचयित करण्यास मदत करते.

टेबलावर चढून डान्स करणे आले अंगलट, एकनाथ शिंदे यांनी आमदारांचा झाप झाप झापले

यामुळे तुम्हाला थकवा जाणवत नाही. तसेच जेवण करण्यापूर्वी नारळ पाणी प्यायल्यास पचनक्रिया बरोबर राहते, तसेच अन्न खाल्ल्यानंतर होणारी सूज टाळता येते. नारळपाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि पचनक्रिया सुधारते. रात्री झोपण्यापूर्वी नारळ पाण्याचे सेवन केल्याने तणाव कमी होतो आणि मन शांत राहते. रात्री झोपताना नारळ पाणी प्यायल्यास शरीरातील सर्व विषारी द्रव्ये लघवीद्वारे बाहेर पडतात, यामुळे नारळ पाणी खूपच फायदेशीर आहे.

महत्वाच्या बातम्या;
भारीच! आता तुमची Activa इलेक्ट्रिक करा, एका वेळेस १०० किमी चालणार...
गुवाहाटीत हॉटेलमध्ये आमदारांचा खर्च नेमका झाला तरी किती, डोळे पांढरे करणारी आकडेवारी आली समोर..
शरद पवारांना मोठा धक्का! सरकार बदलताच पवार अध्यक्ष असलेली परिषद बरखास्त

English Summary: Know the effects of drinking coconut water on an empty stomach, it will be beneficial ...
Published on: 04 July 2022, 10:37 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)