हिवाळ्याच्या दिवसांमध्ये गुळ खाणे शरीराला आरोग्यदायक असते.गुळा मधील औषधी गुणधर्म पोषक ठरतो.रात्री झोपण्यापूर्वी गुळ खाल्ल्याने शरीराला काय फायदे होतात ते जाणून घेऊयात. गुळाचे प्रमाणात सेवन केल्यास आपल्या शरीराला खूप फायदे आहेत, आणि गुळ हा नैसर्गिक रित्या बनलेला खावा. जेवणानंतर बरेच लोक गुळ खातात.काही लोकांच्या घरामध्ये तर साखर न टाकता गुळाचा चहा पितात.गुळा मध्ये खूप प्रमाणात पोषक घटक असतात त्यामुळे बरेच लोक गुळाचा आहार रोजच्या जीवनामध्ये करतात.प्रोटीन, व्हिटॅमिन, फॉलेट, कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस आणि सेलेनिअम एवढे सर्व पोषक घटक गुळामध्ये असतात.आणि सगळ्यात महत्वाचे गुलामध्ये कसल्याच प्रमाणात फॅट नसते.शरीर फिट ठेवण्यासाठी डॉक्टर गुळ खाण्याचा सल्ला देतात.
१.आरोग्य चांगले ठेवण्यासाठी गुळाचे फायदे -
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये थंड वतातवरन असल्यामुळे बरेच लोक आजारी पडतात, त्यामुळे गुळाचे सेवन करने आरोग्याला चांगले असते. गुळामध्ये आढळणारे पोषक घटक संसर्ग होण्यापासून बचाव करतात व शरीराचे संरक्षण करण्याचे कार्य करतात.
हेही वाचा:-गुलाबी आणि पांढऱ्या पेरूमध्ये काय आहे फरक? चांगल्या आरोग्यासाठी करा या पेरुचे सेवन.
२. फिट राहण्यासाठी -
गुळामध्ये पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असते. पोटॅशिअम आपल्या शरीरात इलेक्ट्रोलाइटची पातळीचा समतोल ठेवण्याचे काम करत असते. तसेच पचन होण्याची क्षमता सुद्धा वाढवते.तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार शरीरामध्ये जास्त पाणी जमा होण्याची समस्या दूर होते.
३. मासिक पाळीचा त्रास कमी होणे -
स्त्रियांना मासिक पाळीमध्ये पोटदुखीचा जो त्रास होतो तो गुळ खाल्ल्याने कमी होतो, कारण गुलामध्ये अधिक प्रकारचे पोषक घटक असतात.तसेच मासिक पाळीमध्ये चिडचिड होत नाही मूड चांगला राहतो.गुळ खाल्ल्याने शरीरामधील एंडोर्फिन हार्मोनचा स्राव होतो, त्यामुळे शरीराला आराम भेटतो.गुळ खाल्ल्याने मासिक पाळी दरम्यान जो त्रास होतो तो कमी प्रमाणात राहतो.
हेही वाचा:-Tata ने भारतात केले Nexon चे नवीन Varient लाँच, जाणून घ्या फीचर्स
यकृतही निरोगी राहते -
गुळ खाल्ल्याने आपले शरीर स्वच्छ राहते.शरीरातील हानिकारक विषाणू बाहेर टाकण्याचं काम करते.गुळामुळे यकृत डिटॉक्सिफाय करतात, ताण कमी होण्याचं काम होते.
Published on: 21 September 2022, 04:03 IST