Health

आपल्याला अनेक सारे नारळाच्या पाण्याचे फायदे माहित आहे जर आपल्याला अशक्तपणा आला तर आपण नारळाचे पाणी पितो.नारळ या झाडाचे आणि विशेषतः फळाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत त्यामध्ये नारळ पाण्याच्या सेवनाने विशेषतः त्वचेला अनेक फायदे होतात.

Updated on 20 June, 2021 8:47 PM IST

आपल्याला अनेक सारे नारळाच्या पाण्याचे फायदे माहित आहे जर आपल्याला अशक्तपणा आला तर आपण नारळाचे पाणी पितो.नारळ या झाडाचे आणि विशेषतः फळाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत त्यामध्ये नारळ पाण्याच्या सेवनाने विशेषतः त्वचेला अनेक फायदे होतात.

आजच सुरवात करा नारळाचे पाणी प्यायला:

तुम्ही त्वचेची काळजी घेणारी अनेक उत्पादने वापरली असतील,पण आता नारळाच्या पाण्याच्या अशा गुणधर्मांबद्दल जाणून घ्या.जे आपल्याला हायड्रेटच ठेवणार नाहीत तर आपल्या त्वचेच्या संबंधित बर्‍याच समस्या दूर ठेवतील.तसेच आजारी पडल्यावर डॉक्टर नारळाचे पाणी प्यायला सुचवतात कारण नारळाच्या पाण्यात अँटी मायक्रोबियल सारखे गुणधर्म असतात. नारळाच्या  पाण्यामुळे आपल्या त्वचेवर आलेले मुरुमांचे डाग नाहीसे होतात. नारळाच्या पाण्यामध्ये असणारे अमीनो ॲसिड कोरड्या त्वचेवर उपचार करण्यासाठी अति चांगले असते.

हेही वाचा:हाडांच्या आरोग्यामध्ये कॅल्शिअम चे महत्व

नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण खूप जास्त असल्याने ते सूर्य प्रकाशापासून त्वचेचा बचाव करण्यास देखील हे खूप मदत करते. इलेक्ट्रोलाईट, पोटॅशियम, लोह, मॅंगनीज, व्हिटॅमिन सी आणि फोलेट या सारखे आणखी बरेच पौष्टिक घटक आपल्याला नारळात आढळून येतात. आपल्याला माहित आहे की नारळाचे पाणी हे बिना  साखर टाकता  ही  खूप  गोड असते  पण  जरी नारळाच्या पाण्याची चव गोड असली तरी त्यात नैसर्गिक साखर असते आणि कृत्रिम स्वीटनर अजिबात वापरला जात नाही.त्यामुळे आपल्या शरीराच्या किंवा रक्ताच्या साखर पातळीवर त्याचा काहीही परिणाम होत नाही आणि आपले आरोग्य देखील खूप चांगले राहते.

नारळपाणी एक कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे आणि म्हणूनच हाडांच्या आरोग्यास प्रोत्साहन देते. त्यात अँटीबैक्टीरियल गुणधर्म आहेत, कारण त्यात लॉरिक acid आहे, जो मुरुमांवर उपचार करण्यास मदत करते. हे सोरायसिसच्या उपचारात अप्रत्यक्षपणे मदत करते.

English Summary: Know the benefits of drinking coconut water
Published on: 20 June 2021, 08:47 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)