Health

आरोग्यासाठी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आपण वापर करतो.त्यातील पोषक घटक हे ठरवत असतात की आरोग्यासाठी ते कितपत चांगले आहेत की नाही परंतु बऱ्याच प्रकारचे खाद्यपदार्थांच्या पौष्टिक घटकांबद्दल माहिती असणे देखील तेवढेच गरजेचे असते.

Updated on 14 June, 2022 11:01 AM IST

 आरोग्यासाठी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आपण वापर करतो.त्यातील पोषक घटक हे ठरवत असतात की आरोग्यासाठी ते कितपत चांगले आहेत की नाही परंतु बऱ्याच प्रकारचे खाद्यपदार्थांच्या पौष्टिक घटकांबद्दल माहिती असणे देखील तेवढेच गरजेचे असते.

जर आपण या सगळ्यांच्या बाबतीत फोर्टिफाइड तांदूळ कितपत आरोग्यासाठी फायदेशीर आहे की हानिकारक हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो.

कारण कुपोषणाची समस्या मोठ्या प्रमाणात आहे, त्या समस्येला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार देशात मोठ्या प्रमाणात या फोर्टिफाइड तांदळाचे वितरण करणार आहे.

यासंबंधी नवी दिल्ली येथे केंद्रीय अन्न सचिवांच्या कार्यालयातील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात एम्सच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ.कपिल यादव यांनी लोकांच्या मनात असलेली फोर्टिफाइड तांदळा बद्दल असलेली भीती दूर करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी ते म्हणाले की, तांदूळ दुर्गीकरण योजनेचे फायदे जोखमी पेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत.  केवळ 0.01 टक्के लोकसंख्येला विशेषतः ज्यांना थॅलेसेमिया मेजरने ग्रस्त केलेले आहेत अशांना हा तांदूळ आरोग्यास धोका निर्माण करू शकतो.

फोर्टिफाइड तांदूळ गलगंड, थायरोटॉक्सिकोसिस, मेंदूचे नुकसान, गर्भ आणि नवजात शिशुच्या आरोग्य आणि लोकसंख्येची उत्पादनक्षमता सुधारण्यास मदत करते. स्टेपल फूड फोर्टिफिकेशन अँड कॉम्प्लिमेंटरी स्ट्रॅटेजी टु एड्रेस मायक्रोन्यूट्रिएंट डिफीशीयन्सी या विषयावर प्रेझेंटेशन करताना ते म्हणाले की, सूक्ष्म पोषक घटकांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी फुड फोर्टिफिकेशन हे एक  किफायतशीर पूरक धोरण आहे.

जर आपण नेहमीच्या तांदळाचे तुलना फोर्टिफाइड तादुळा सोबत केली तर यामध्ये लोह, विटामिन b12, जस्त आणि फॉलिक ऍसिड जास्त प्रमाणात असते.

नक्की वाचा:Health Point: दूध प्या परंतु बसून की उभे राहून? जाणून घ्या या बाबतीत तज्ञांचे नेमके मत

 जगात 200 कोटींपेक्षा जास्त लोकांमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता

 डॉ. यादव याबाबत म्हणाले की जर आपण जागतिक स्तराचा विचार केला तर 200 कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या मध्ये सुषमा अन्नद्रव्यांचे प्रचंड कमतरता आहे. 

यामध्ये 160 कोटी लोकांना ॲनिमिया आहे. 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त लोकांमध्ये लोहाची कमतरता असून दरवर्षी 2 लाख 60 हजार 100  गर्भधारणा न्युरल ट्यूब डिफेक्ट्स मुळे प्रभावित होतात. अनेक सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आहे मानवी विकासाचे महत्त्वाचे कारण आहे.

नक्की वाचा:Health Alert: 'ही'लक्षणे दिसताच ओळखा हृदयविकाराचा धोका,वाचण्यासाठी करा या गोष्टी

या तांदळाचे पहिले वितरण

 सन 2019-20 यावर्षी तांदूळ तटबंदी आणि सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून या तांदळाचे वितरण यावर एक पथदर्शी योजना सुरू करण्यात आली व पुढील तीन वर्षाच्या कालावधीसाठी त्याची अंमलबजावणी करण्यात आली.

या प्रायोगिक योजनेच्या माध्यमातून 11 राज्यांनी त्यांच्या ओळखलेल्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हा तांदूळ वितरित केला.

या पायलट योजनेचा कालावधी एकतीस मार्च दोन हजार बावीस रोजी संपला. त्याअंतर्गत जवळजवळ 4.30लाख मेट्रिक टन तांदूळ वितरित करण्यात आला.परंतु आता 2024 पर्यंत मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

नक्की वाचा:महत्वाचे! तुम्ही खरेदी केलेल्या औषध खरे आहे की बनावट अगदी ओळखता येईल 15 सेकंदात

English Summary: know about health benifit to fotified rice by medical aims expert doctor
Published on: 14 June 2022, 11:01 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)