हात मोडल्यावर (फ्रॅक्चर झाल्यावर) लवकर बरे होण्यासाठी काय खावे? चिकन आणि अंडी यावर प्रभावी आहेत का? हात मोडल्यावर किंवा कुठल्याही प्रकारचे फ्रॅक्चर झाले असता लवकर बरे होण्याचा एक देशी पण अत्यंत प्रभावी औषध मी सांगणार आहे.पालघर जिल्यातील वाडा तालुक्यात सूर्यमाळ नावाचे एक गाव आहे. तिथले अदिवासी बांधव एक जंगली वनस्पतीच्या मुळ्या गोळा करतात. हाड मोडल्यावर त्या मुळ्या पाण्यात भिजवून घेतल्यास 7 ते 8 दिवसात हाड जुळून येते. मी स्वतः या औषधाचा
उपयोग माझ्या आईसाठी दोन वेळेस केला आहे. गेल्या वेळेला आईच्या हाताचे हाड पंज्या जवळ 4 5 तुकड्यात मोडले होते. डॉक्टरांनी प्लास्टर केले आणि आठ दिवसांत
ऑपरेशन करून सळ्या टाकाव्या लागतील असे सांगितले होते.The doctor applied a plaster and said that the splints would have to be removed after an operation in eight days. त्यावेळी मी हे औषध आणून दिल्यानंतर आठ दिवस एकदिवस आड करून 3 वेळा तिला दिले. ऑपरेशन साठी आठ दिवसांनी गेलो असता पुन्हा एक्स रे काढला तेव्हा हाड सगळीकडे जुळून आलेले दिसले. डॉक्टर पण गमती मध्ये म्हणाले की तुम्ही माझे नुकसान केले. त्यांनी
देखील मान्य केले की 65 वर्षाच्या वयात आठ दिवसात हाड आश्चर्यकारक रित्या जुळून आले.औषध वापरण्याची पध्दत: औषधाच्या मुळ्या डोस प्रमाणे झाडाच्या पानाच्या पुडीमध्ये बांधून मिळतात. एका पुडीतील औषध रात्री तांब्याच्या भांड्यात ग्लास भर पाण्यात भिजत ठेवायचे आणि सकाळी रिकाम्या पोटी ते पाणी प्यायचे. नंतर तासभर काही खाऊ नये. शक्यतो मांसाहार टाळावा. एक दिवस सोडून औषध घ्यावे.औषध मिळण्याचे ठिकाण: सूर्यमाळ येथे गेल्यास कुठेही चौकशी केली असता लोक आणून देतात.
अगदी 20 रुपये ते 50 रुपये पुडीमागे खर्च येतो. मी दोन वेळेस स्वतः जाऊन आणले आहे.पण आता वाडा तालुक्यातील एक केमिस्ट श्री चाफेकर यांनी समाजसेवा तत्वावर फक्त कुरियर चार्जेस आणि औषधाचे आदिवासी बांधवाना द्यावा लागणारा अल्प मोबदला आकारून औषध घरपोच पोहोचवण्याची सोय केली आहे. माझ्या जवळच्या मित्रमंडळी आणि नातेवाईक यांच्यासाठी मी अनेक वेळा हे औषध चाफेकर यांच्याकडून मागवले आहे. चार पुड्या मी नेहमी डीप फ्रीझ मध्ये ठेवत असतो.
१) श्री.चाफेकर मु.पो.ता.वाडा, जि.पालघर, - 421303. संपर्क 09225189371, 09225189373
२) श्री.किरण, भिवंडी M.: 8087348067 ३) श्री.हरेश्वर, वसई (निर्मळ) M.: 9860700504
Published on: 13 November 2022, 08:32 IST