Health

गूळ आपल्या आहारातील एक महत्वाचा घटक आहे, अनेक पदार्थ हे केवळ गूळ टाकुनच बनवले जातात. गूळ हा चवीला गोड आणि चांगला रुचकर असतो त्यामुळे याचे सेवन अनेकजन मोठ्या चविणे करतात. जसा गूळ खाण्याला चवदार लागतो तसेच गुळाचे सेवन देखील आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर ठरत असते. गुळात नैसर्गिक रित्या साखर असते, त्यामुळे लोक जेवणानंतर गुळ खाणे अधिक पसंत करतात. गुळात प्रोटीन विटामिन आयरन कॅल्शियम इत्यादी पोषक घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. तसेच गुळात फॅट हा एकदम नगण्य प्रमाणात आढळतो, त्यामुळे गुळाचे सेवन वजन कमी करण्यास मदत करते. अशिया गुणकारी व औषधी गुणधर्मांनी युक्त गुळाचे आपल्या शरीराला होणारे फायदे आपण समजून घेणार आहोत. चला तर मित्रानो वेळ न दवडता जाणुन घेऊया याविषयी.

Updated on 27 December, 2021 6:34 PM IST

रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी मदत करते

गुळात मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट आणि झिंक आढळते, हे पोषक तत्त्वे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी मदत करत असतात. तसेच हे पोषकतत्वे आपल्या शरीराला अनेक रोगांच्या संक्रमणापासून वाचवते. याशिवाय जर आपण रोज रात्री गुळाचे सेवन करत असाल तर आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढते.

पाचन तंत्र सुधारते

गुळाचे नियमित सेवन केल्याने आपले पाचन तंत्र मजबूत होते, ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास असेल त्या लोकांनी गुळाचे नियमित सेवन करावे असा सल्ला दिला जातो. जर आपण रात्री जेवणानंतर गुळाचे सेवन करत असाल तर यामुळे आपले पाचन तंत्र खूप मजबूत होते आणि बद्धकोष्ठता सारखा त्रास होत नाही तसेच गुळाचे नियमित सेवन केल्याने पोटासंबंधित अनेक विकार दूर होतात.

मासिक धर्मात होणाऱ्या वेदना कमी करते

गुळात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, गुळात असलेले पोषक घटक मासिक धर्मात होणारा त्रास कमी करण्यास मदत करतात. तसेच गुळाचे नियमित सेवन केल्याने थकवा जाणवत नाही व मूड फ्रेश राहतो. आपण रोज रात्री जेवणानंतर गुळाचे सेवन करू शकता, आपणास जर फक्त गुळ खाणे आवडत नसेल तर आपण या सोबत दुधाचे देखील सेवन करू शकता.

लिव्हर तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते

गुळाचे नियमित सेवन केल्याने आपले लिवर तंदुरुस्त राहते. गुळाला बॉडी क्लिजर म्हणुन ओळखले जाते, म्हणुन लिव्हर तंदुरुस्त ठेवण्यास गुळाचे सेवन फायदेशीर ठरते.

Disclaimer:- सदर आर्टिकल मध्ये दिलेली माहिती ही केवळ सामान्य माहिती प्रदान करते हा कुठलाही वैद्यकीय सल्ला नाहीय. अधिक माहितीसाठी अथवा सल्ल्यासाठी नेहमी एखाद्या विशेषज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांकडे जावे.

English Summary: jaggery benifits for human health in details
Published on: 27 December 2021, 06:34 IST