Health

गर्भवती महिला ही दोन जीवांना सांभाळत असते. त्यामुळे तिचे योग्य पद्धतीने पोषण होणे अतिशय आवश्यक असते. पोषण चांगले होण्यासाठी आहाराची अतिशय महत्त्वाची भूमिका असते. महिला गर्भवती आहे हे कळल्यापासून घरातील वडीलधाऱ्यांकडून तिला अनेक सल्ले दिले जातात.

Updated on 17 May, 2022 2:29 PM IST

गर्भवती महिला ही दोन जीवांना सांभाळत असते. त्यामुळे तिचे योग्य पद्धतीने पोषण होणे अतिशय आवश्यक असते. पोषण चांगले होण्यासाठी आहाराची अतिशय महत्त्वाची भूमिका असते. महिला गर्भवती आहे हे कळल्यापासून घरातील वडीलधाऱ्यांकडून तिला अनेक सल्ले दिले जातात.

या व्यतिरिक्त सध्या इंटरनेटवर बरीच माहिती उपलब्ध आहे, त्यामुळे महिला त्या आधारे आपल्या आहाराचे नियोजन करतात. परंतु फ्लोरिडा विद्यापीठाच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की गर्भधारणेदरम्यान मासे खाल्ल्याने बाळामध्ये दमा होण्याचा धोका कमी होतो. माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त असते.

 गर्भवती महिलेने शेवटच्या तीन महिन्यांत गर्भवती महिलेने मासे खाल्ले तर बाळाला श्वसनाचा त्रास होत नाही. त्यामुळे गर्भवती महिलांनी आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा ठराविक मासे खावेत. संशोधकांनी ३४६ महिलांचा अभ्यास केला. संशोधन करताना गरोदरपणाच्या शेवटच्या ३ महिन्यांत त्यांना मासे खाऊ घालण्यात आले.

 नंतर त्यांच्या बाळाच्या प्रकृतीची तपासणी केली असता बाळाला श्वसनाशी निगडीत त्रास कमी होत असल्याचा निष्कर्ष निघाला. ओमेगा ३ फॅटी अॅसिड सहज तयार होऊ शकत नसले तरी सी फूडमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते असे संशोधकांचे म्हणणे आहे. हे मासे केवळ श्वासोच्छवासासाठीच नाही तर गर्भाच्या सर्वांगीण वाढीसाठीही खूप उपयुक्त आहेत.

याव्यतिरिक्त गर्भवती महिलेला इतर पोषण आहाराचीही गरज असते, ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यामुळे आपण वैद्यकीय सल्ला घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका.

महत्वाच्या बातम्या
अशोक खाडे; आईने मजुरी केलेली शेती विकत घेणारा उद्योजक

English Summary: It would be beneficial to eat fish during pregnancy
Published on: 17 May 2022, 02:29 IST