वजन वाढविण्यासाठी खजूर खाणे आहे फायद्याचं

*खजूर खाण्याचे फायदे*  Gatty Images

*खजूर खाण्याचे फायदे* Gatty Images

खजूरा मध्ये खूप पोषक तत्व असतात, खजूर हे शरीरासाठी चांगले असते, त्यामुळे लोक खजूर आवडीने खातात. आपल्या शरीराला रोजची गरजेची असलेली पोषकतत्वे मिळत असल्याने खजूराला पूर्ण अन्न म्हटले जाते. त्यामुळे खजूर शक्तीवर्धक, अशक्तपणा कमी करणारं आणि शरीराला ऊर्जा देणारं फळ आहे. खजूर खाल्ल्यास तुम्हाला तात्काळ उर्जा मिळते. आयुर्वेदानुसार खजूर शक्तीवर्धक, पौष्टिक, श्रमहारक आणि वीर्यवर्धक फळ आहे.

खजूरामध्ये असलेले पोषक तत्व

खजूरा मध्ये विविधप्रकारचे जीवनसत्वे असतात. तसेच खनिजे, फायबर, तेल, कॅल्शियम, सल्फर, पोटाशियम, पोस्फोरास, मॅग्नीस, कॉपर आणि मॅग्निशिम यांसारखे तत्व असतात, हे तत्व आपल्या आरोग्यासाठी व शरीरासाठी उपयोगी असतात.

● बद्धकोष्ठतेच पासून बचाव

बऱ्याच जणांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो, त्यांच्यासाठी खजूर हे एक प्रकारे वरदान आहे. खजूर रात्रभर पाण्यात भिजून ठेऊन ते सकाळी खाल्याने त्याचा आपल्याला चांगला लाभ होतो, खजूरामध्ये सॉयुबल फाइबर असतात यामुळे हे बद्धकोष्ठतेवर खूप फायदेमंद असतात.

 

● वजन वाढवण्यासाठी उपयोगी

आपल्याला आपले वजन वाढवायचे असतील तर खजूर हे खूप फायदेमंद ठरतात, खजूरामध्ये प्रोटीन, विटामीन्स तत्व व शुगर असते, १ किलो खजूरामध्ये ३००० कॅलरीस असतात, खजूर रोज नियमितपणे खाल्याने आपल्याला याचे फायदे होतील.

● कॅन्सर पासून बचाव

कॅन्सर सारखा आजार मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि कॅन्सर ला आटोक्यात आण्यासाठी अनेक संशोधन हि केले जात आहेत. एका संशोधनात असे आढळून आले आहे कि खजूर खाल्याने पोटाचा कॅन्सर होण्याचा चा धोका तसेच त्याचा प्रभाव कमी होतो. खजूर हा सगळ्यांसाठी लाभदायी आहे त्याचे कोणतेही दुष्परिणाम नसतात, म्हणून आपण खजुराचे रोज सेवन करा, यामुळे आपल्याला खूप फायदे होतील.

● हृद्या संबंधी होणाऱ्या आजारांसाठी फायदेमंद

खजूर रात्रभर पाण्यात भिजऊन ठेवा व सकाळी भिजवलेला खजूराचा चुरा करून खा, हे हृदयासाठी उपयोगी आहे. याच्यात पोट्याशियम असते, हे हृदय झटका व इतर हृदय संबंधी होणाऱ्या आजारांचा धोका कमी करतो. खजूर खाल्याने आपला कोलेस्ट्रोल नियंत्रित राहते.

●अशक्तपणा दूर होतो

अशक्तपणा खास करून महिलां मध्ये आढळते. ज्या लोकांना अशक्तपणा असतो ते लोक रक्त दान करू शकत नाहीत. ज्या लोकांना अशक्तपणा असतो त्यांच्या साठी खजूर खूप फायदेमंद आहे, खजूरामध्ये आयन मोठ्या प्रमाणात असतात. खजूर खाल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे स्थर सुधारते. खजूर खाल्याने आपल्याला ऊर्जा मिळते, शक्ती मिळते, यामुळे थकावट व सुस्थी दूर होते. खजुराचे फायदे तसेच इतर आजारांवर गुणकारी
खजूर रोज खाल्याने आपल्याला हाडांसंबंधी त्रास होणार नाही, यामुळे हाडे मजबूत होतात.
नियमित पणे खजूर खाल्याने कोणत्याही प्रकारची एलर्जी होत नाही.खजूर खाल्याने आपल्याला ताजेतवाने वाटते, आपल्याला ऊर्जा मिळते.


संकलन: नितीन जाधव
स्रोत:- आरोग्यविद्या
९१९०८२५५६६९४
प्रतिनिधी - गोपाल उगले

खजूर खजूर खाण्याचे फायदे Benefits of eating dates वजन वाढवा Gain weight
English Summary: It is beneficial to eat dates to gain weight

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.