आरोग्याच्या बाबतीत असलेल्या छोट्या मोठ्या समस्यांचा विचार केला तर जसजसे वय वाढत जाते तसे तसे शरीरामध्ये अनेक कुरबुरी सुरू होतात. त्यामुळे जर विचार केला तर वयाच्या तिशीनंतर आणि चाळीशी पर्यंत जर आरोग्याबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले व त्या पद्धतीने आपला आहार ठेवला तर निश्चितच उद्ववणाऱ्या आरोग्य समस्या बऱ्यापैकी कमी ठेवता येतात. या लेखामध्ये आपण आहारामधील अशा काही गोष्टी पाहू, यांचा आहारात समावेश केल्याने चाळीसी नंतर देखील तंदुरुस्त राहण्यास मदत होईल.
अशा पद्धतीने हवे आहाराचे नियोजन
1- 'या' बियांचा वापर ठरेल फायदेशीर- शरीरासाठी आहार महत्त्वाचा असल्यामुळे जर आपण आहारामध्ये काही बियांचा समावेश केला तर बियांमध्ये पचनासाठी लागणारे आवश्यक प्रथिने, पिष्टमय पदार्थ तसेच खनिजे व फाईटोनुट्रीयन्ट असतात.
यामध्ये उदाहरणच घ्यायचे झाले तर भोपळ्याच्या बिया मध्ये असलेल्या झिंकमुळे प्रोस्टेट व युरिनरी त्यांचे आरोग्य उत्तम राहते. तसेच तीळ मध्ये असलेल्या मॅग्नेशियम व ई जीवनसत्व शरीरातील धमन्या साठी खूप फायदेशीर आहे. त्यासोबतच सूर्यफुलाच्या बियांमध्ये हाडांसाठी उपयोगी असलेले फॉस्फरस व मॅग्नीज असते.
2- दही- ऑस्ट्रेलिया विद्यापीठातील अलेक्झांड्रा वेडनुसार विचार केला तर दहीमध्ये असलेले जिवंत जिवाणू प्रथिने स्त्रवण्यास मदत करतात. त्यामुळे शरीरातील ब्लडप्रेशर नियंत्रणामध्ये राहण्यास मदत होते. त्यामुळे जर आहारामध्ये दररोज दीडशे ते दोनशे ग्रॅम साध्या दहीचा समावेश केला तर फायदा होतो.
3- रात्री उशिरा जेवण करणे टाळावे- जर रात्री उशीरा जेवायची सवय असेल तर त्यामुळे ग्लुकोज टॉलरन्स बिघडतो. इतकेच नाही तर फॅट बर्न कमी होतो व रक्तातील साखर वाढते. परिणामी मधुमेहासारखे आजार जडतात.
4- विटामिन डी सप्लीमेंट सुरू करणे- याच्या कमतरतेमुळे हार्टच्या संबंधित आजारांचा धोका इतरांच्या तुलनेमध्ये दुप्पट असतो.
त्यामुळे काही आरोग्य तज्ञांच्या मतानुसार वेळेअभावी आजकाल उन्हापासून आपण ड जीवनसत्व मिळू शकत नसल्याने त्याचे सप्लीमेंट सुरू करून त्या माध्यमातून शरीराला पुरवठा करणे हा एक उत्तम पर्याय आहे.
5- विविध भाज्या आणि फळे यांचा समावेश- दिवसातून तीन-चार वेळेस भाज्या व फळे खाल्ल्यास आजार बऱ्याच अंशी दूर राहतात. दिवसातून जर तीन वेळा भाज्या व दोन वेळा फळे खाल्ली तर पुरेशा प्रमाणात शरीराला पोषक तत्त्वे मिळतात.
यासोबतच हिरवी पालक, बिटा केरोटीन युक्त भाज्या व आमलवर्गीय फळे खूप आवश्यक असतात.
6- धावणे- दररोज जर दोन हजार पावले चालले तरी मृत्यूची जोखीम बत्तीस टक्क्यांपर्यंत कमी होते व त्याचा शरीराला खूप काय फायदा होतो.
( टीप- वरील माहिती विविध स्त्रोतांकडून घेतली असून वाचकांसाठी माहितीस्तव सादर केली आहे. या माहितीशी व्यक्तिगतरित्या आणि कृषि जागरण समूह सहमत असेलच असे नाही. आहारात कुठलाही बदल करणे अगोदर वैद्यकीय तज्ञांचा आणि आहारतज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Published on: 29 July 2022, 12:42 IST