Health

उन्हाळ्यात वाढणारा उन्हाचा तडाखा त्रासदायक असले तरीही रसदार आंब्यांची चव चाखण्यासाठी प्रत्येकाला उन्हाळा हवाहवासा वाटतो. आंबा हे शरीराच्या दृष्टीने आरोग्यदायी व शक्तिवर्धक फळ आहे. भारतामध्ये जवळपास आंब्याच्या १३०० प्रजाती आढळतात.

Updated on 07 May, 2021 11:42 AM IST

उन्हाळ्यात वाढणारा उन्हाचा तडाखा त्रासदायक असले तरीही रसदार आंब्यांची चव चाखण्यासाठी प्रत्येकाला उन्हाळा हवाहवासा वाटतो. आंबा हे शरीराच्या दृष्टीने आरोग्यदायी व शक्तिवर्धक फळ आहे. भारतामध्ये जवळपास आंब्याच्या १३०० प्रजाती आढळतात. त्यापैकी काही महत्त्वाच्या २५ ते ३० जाती व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या असल्यामुळे त्याचे जास्तीत जास्त उत्पादन घेतले जाते.

हापुस, तोतापुरी, पायरी, नीलम, बदामी अशा विविध प्रकारातील आंबे चवीला जितके मधूर असतात तितकेच आरोग्यालाही पौष्टिक असतात. आंब्यामध्ये अ जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आढळते. फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्यामध्ये फायबर, व्हिटामिन्स, मिनरल्स अ‍ॅन्टीऑक्सिडंट, थायमीन, नायसिन, रिबोफ्लेवीन, पायरीडॉक्सीन घटक मुबलक प्रमाणात असतात तर खनिजांपैकी कॅल्शियम, तांब, लोह, मॅग्नेशियम, मॅगनीज आणि जस्त अधिक प्रमाणात असतं.

आंबा पोळी बनवण्याची रेसीपी :

 साहित्य :

  • २ कप आंबा रस
  • १/४ कप साखर
  • १ टेबलस्पून पानी

 

हेही वाचा : कावीळ रोगासह मुतखड्यावर गुणकारी आहे ऊसाचा रस

कृती :

  • एका पॅनमध्ये साखर पानी घालून साखर विरघळूण घ्या. मग त्यात मिक्सरवर बारीक केलेला पेस्ट घालावी.

  • ते मिश्रण मंद आचेवर घोटत रहा. घोटून घोटून एकजीव गोळा तयार झाला की गॅस बंद करा.

  • एका ताटाला तुप लावून घ्या. त्यावर हे सारण पसरवून वरून प्लास्टिक ठेवून लाटून पसरवून घ्या. मग थंड झाले की कट करून घ्या.

  • आणि एका प्लेट मध्ये ते काढा आणि सर्व्ह करा.

     

आंब्याचे आरोग्यदायी ायदे :

  • आंब्यात व्हिटॉमिन ए, आयर्न, कॉपर आणि पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात.

  • कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. आंबा फळ हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असा जीवनसत्व असणारा समृद्ध स्रोत आहे. ह्या फळात  व्हिटॅमिन सी असल्यामुळे या पौष्टिकतेमध्ये अँटिऑक्सिडेंटचे गुणधर्म असतात, जे आपली रोग प्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करतात.

  • आंब्यात शर्करा असल्याने आंब्यापासून शरीरास ऊर्जा मिळते.

  • आंब्याचे दुधाबरोबर सेवन केल्याने शरीराचे वजन वाढण्यास मदत होते.

  • आंब्यामुळे शरीराला बीटा कॅरोटिन व अल्फा कॅरोटिन यांचा मुबलक पुरवठा होतो. यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते व दृष्टी उत्तम राहते.

  • आंब्यात कॅरोटिन असल्याने फुफ्फुसाच्या कर्करोगापासूनही बचाव होतो.

  • आंब्यात असे अनेक विकर आहेत जे प्रथिने तोडण्याचे काम करतात. यामुळे भोजन लवकर पचते.

  • आंब्यामधून शरीराला पोटॅशियमचा पुरवठा होतो. पोटॅशियमच्या योग्य प्रमाणामुळे रक्तदाब संतुलित राहतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

  • ज्या लोकांना सतत विसरायची सवय असते. त्या लोकांसाठी आंब्याचा सेवन करणे फायदेशीर आहे. आंब्यामध्ये ग्लुटामिन ऍसिड नावाचा एक पौष्टिक तत्व आहे जे आपली स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात.

  • आंबा हे एक विकर समृद्ध स्त्रोत म्हणून ओळखले जाते जे प्रथिनांचे विघटन करण्यास मदत करतात.

लेखक

रोहिना शेख, 

डॉ. भारत आगरकर

 दिपाली गजमल

अन्न अभियांत्रिकी विभाग,अन्नतंत्र महाविद्यालय,

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, ४३१-४०२

मो. ७७२०८१०४२०

Gmail: rohina2441997@gmail.com 

English Summary: Increase memory and immunity by eating spicy mango bread
Published on: 07 May 2021, 06:48 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)