Health

तीळ खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच तिळामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडेंट्सचा स्रोत आहे.

Updated on 19 May, 2022 5:07 PM IST

तसेच तीळातील पॉलिसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स, ओमेगा-6, फायबर, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक शरीरासाठी पोषक असतात. तीळात सेसमीन नावाचे अँटीऑक्सिडंट असते. त्यामुळे कर्करोगाच्या पेशी वाढत नाहीत. त्यामुळे फुफ्फुस, पोट, गर्भाशय, स्तन, रक्त यांचे कॅन्सर होण्याची शक्यता कमी करतात.हाडांसाठी फायदेशीर– तीळामध्ये विशेषतः कॅल्शियम आणि फॉस्फरस सारख्ये पोषक घटक असतात. ही खनिजे नवीन हाडे तयार करण्यात आणि हाडे निरोगी ठेवण्यास मदत करतात. तीळ भाजून किंवा कच्चे देखील खाल्ले जातात. 

तीळात अँटीऑक्सिडेंट नावाचे घटक असतात. जे बर्‍याच रोगांच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहेत. उच्च कोलेस्ट्रॉल– एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, नियमितपणे तीळ खाल्यास खराब कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसेराइड कमी करण्यास मदत होते. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. उच्च रक्तदाब– तीळामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण अधिक असते. हे रक्तदाब कमी करण्यास मदत करते. संशोधनात असे दिसून आले आहे की, तिळात लिग्निन, व्हिटॅमिन ई आणि इतर अँटीऑक्सिडेंट्ससारखे अनेक घटक आढळतात.

ज्यामुळे निरोगी रक्तदाब नियंत्रणात राहतो. याशिवायही तीळ बहुगुणी आहे.मधुमेह – तीळात प्रथिने आणि फायबर असते. हे सर्व रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात. यात पिनोरेसिनॉल आहे. हे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते. म्हणूनच मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही तीळाचा समावेश आहारात करा
तणावापासून मुक्ती मिळवा– आजकाल धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकालाच वेगवेगळ्या प्रकारचे तणाव असतात. तिळाच्या सेवनाने तुमच्या मेंदूची ताकद वाढण्यास मदत होते. लिपोफोलिक अँटीऑक्सिडंटमुळे वयवाढीचा मेंदूवर परिणाम होत नाही.
हृदयाचे स्नायू तंदुरुस्त राखा– तिळात आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, सेलेनियम यासारखे घटक असतात. त्यामुळे हृदयाचे स्नायू सक्रिय राहण्यास मदत होते.
 त्वचेसाठी फायदेशीर– तीळामध्ये अँटीऑक्सिडेंट, प्रतिजैविक आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हे त्वचेसाठी फायदेशीर आहे. तसेच तीळाचे तेल त्वचेच्या पेशींचे प्रदूषण आणि अतिनील किरणांपासून होणारे नुकसानपासून संरक्षण करते.जखमेच्या उपचार, वृद्धत्व यासाठी देखील तीळाचे तेल वापरले जाऊ शकते.
केसांसाठी देखील तीळाचे तेल फायदेशीर आहे.
English Summary: Include sesame seeds in your daily diet.
Published on: 19 May 2022, 04:40 IST