मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्याच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची घोषणा केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राज्यात 700 दवाखाने सुरू करण्यात येणार असून, ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या नावाने हे दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत.
राज्याची ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचे उद्दिष्ट असून यासाठी आरोग्याचा निधी दुप्पट करणार असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार आहोत.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे, राज्यभर सुमारे 700 ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ (Balasaheb Thackeray Aapla Davakhana) सुरू करणे, बाल आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रीत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
वाहनधारकांना चटका; सीएनजीच्या दरात इतक्या रुपयांनी वाढ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एनडीटिव्ही वृत्तवाहिनीच्या ‘स्वस्थ बनेगा इंडिया’ या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. शिंदे यांच्या सोबत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, ज्येष्ठ पत्रकार प्रणव रॉय यांनी देखील संवाद साधला. शिंदे यांनी यावेळी बाल आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रीत करणार असल्याचे देखील सांगितले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेचे जाळे मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. राज्यात सुमारे ७०० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येणार आहे.
आपला दवाखान्याच्या माध्यमातून नागरिकांना घराजवळ आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगतानाच मुंबईत २२७ ठिकाणी असे दवाखाने सुरू करण्यात येणार असून त्यापैकी ५० दवाखाने २ ऑक्टोबरपासून सुरू झाले आहेत.
शेतकऱ्यांची चांदी, या दिवशी खात्यात 2000 रुपये येणार
प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांच्या बळकटीकरणासाठी आरोग्य संस्थांचे श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे. जेणे करून ग्रामीण भागातील नागरिकांना जर्जेदार आरोग्य सुविधा त्यांना स्थानिक पातळीवरच मिळू शकेल. सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेऊन आरोग्य संस्थांचे सक्षमीकरण केले जात आहे.
राज्यात कॅथलॅब देखील सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या भागातील आरोग्य संस्थांचे काम ८० ते ९० टक्के पूर्ण झाले आहे तेथे निधी उपलब्ध करून ते काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी आणि नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. ग्रामीण भागातील आरोग्याच्या क्षेत्रात आशा स्वयंसेविकांचे योगदान महत्वाचे आहे.
Published on: 03 October 2022, 02:41 IST