Health

दिवसेंदिवस उन्हाचा पारा हा वाढतच चालला आहे. उष्णतेत वाढ होत चालली असल्यामुळे शरीराची पूर्ण लाहीलाही होत चालली आहे. या कडक उन्हामध्ये आपण आजारी पडू नये म्हणून आपण आपल्या तब्बेतीची काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. उन्हाळयात जास्त घाम येत असल्याने आपल्या शरीरातली पाण्याची जी पातळी आहे ती कमी होते. पाण्याची पातळी घटताच आपल्या शरीरातील ग्लुकोज, सोडियम तसेच आपल्या शरीराला जे ऊर्जा देणारे आणि फ्रेश ठेवणारे घटक असतात ते निघून जात असल्याने आपल्याला अशक्तपणा जाणवतो. उन्हाळयात जर आपणास आपली त्वचा फ्रेश ठेवायची असली तर आपल्या आहारात ५ पदार्थांचा समावेश असणे गरजचे आहे. जे की यामुळे पाण्याची पातळी देखील वाढते आणि त्वचेचा पोत देखील सुधारतो.

Updated on 03 April, 2022 4:48 PM IST

१. टरबूज :-

टरबूज या फळामध्ये जास्त पाणी असते त्यामुळे उन्हाळयात टरबूज खायला विसरू नका. आपल्या त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवण्याचे काम टरबूज करते त्यामुळे आपण टरबूज खालले पाहिजे. टरबूज फळासोबत खरबूज हे फळ सुद्धा उन्हाळयात येते. खरबूज सुद्धा खाणे गरजेचे आहे कारण खरबूज फळात देखील जास्त प्रमाणात पाणी असते. टरबूज व खरबूज खाण्याने आपली त्वचा निस्तेज दिसते तसेच डिहायड्रेट होणे असे त्रास टळतात.

२. ताक :-

उन्हाळ्यामध्ये एक सुपर ड्रिंक म्हणले तर ताक आहे. जर तुम्हाला वेळ भेटत नसेल तर तुम्ही मसाला ताक तयार करण्याच्या फंदात पडू नका. दही चांगले हलवून त्यामध्ये मीठ आणि जिरेपूड टाका आणि थंडगार ताक प्या. ताकामध्ये साखर टाकण्याच्या फंदात पडूच नका. साखर ही उष्ण असते मात्र जिरे आपल्या शरीराला थंडावा देतात त्यामुळे ताकामध्ये जिरेपूड टाकणे विसरू नका.

३. काकडी :-

उन्हाळ्यात आपल्या आहारात काकडीचे प्रमाण वाढवा. कारण काकडी या फळात जवळपास ८० टक्के पाणी असते. आपल्या शरीरात जी उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता भासते ती कमतरता भरून काढण्यासाठी काकडी गरजेची आहे. जेवण करतेवेळी सुद्धा तुम्ही काकडी खाऊ शकता. काकडी हे थंड फळ आहे जे की तुमच्या शरीरातील सर्व गरमी बाहेर पडून शरीरात थंडावा निर्माण करण्याचे काम काकडी करेल.

४. लिंबू :-

उन्हाळयात लिंबू सरबत घेणे आपल्या शरीरास आवश्यक आहे. कारण लिंबातून व्हिटॅमिन सी मिळते जे आपल्या शरीराच्या त्वचेसाठी पोषक ठरते. दिवसातून कमीत कमी २-३ वेळा लिंबू सरबत घ्या. शरीरात जी उष्णता असते ती कमी करण्याचे काम लिंबू सरबत करत असते.

English Summary: In summer, these 4 superfoods are essential for the body, it will be beneficial for the skin and it will be good for the skin.
Published on: 03 April 2022, 04:44 IST