जर मानवी शरीराचा विचार केला तर मानवी शरीरामध्ये साधारणतः एक किलो पर्यंत कॅल्शियम आढळते. यापैकी 99 टक्के हाडांमध्ये असते. या कॅल्शियम चे प्रमाण कमी झाल्यास होणारा त्रास व त्यामुळे घ्यावयाच्या काळजी याबद्दलची माहिती या लेखात घेऊ
हाडे, मणक्यातील ताकद तसेच हृदय आणि इतर स्नायूंचे कामकाज सुरळीतपणे चालण्यासाठी कॅल्शिअमची नितांत आवश्यकता असते. शरीरातील इतर आणि प्रक्रिया तसेच शरीरातील असंख्य भागांवर आणि रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये कॅल्शिअम महत्त्वाची भूमिका बजावते.
कॅल्शियमची कमतरता आणि त्याची लक्षणे
ज्यावेळी शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता निर्माण होते, त्याला हैपोकल्समिया असे म्हणतात. यामध्ये स्नायू आकुंचन पावतात व त्याचा परिणाम सरळ हृदयावर होऊन रक्त गोठण्याची प्रक्रिया व्यवस्थित होत नाही. अशा स्थितीमध्ये हाडांमध्ये असलेले कॅल्शिअम रक्तामध्ये ओढले जाऊन ते हृदय, मेंदू, नसा इत्यादी शरीरातील भागांना पुरविले जाते. त्याचा परिणाम हाडे ठिसूळ होणे मध्ये होतो. हृदय, मेंदू, नसा त्यांचे कामकाज सुरळीत करण्याचा प्रयत्न शरीर करत असते. ज्या लोकांच्या आहारामध्ये कॅल्शियमची कमतरता असते अशा लोकांचे हाडे ठिसूळ होत जातात. परिणामी अशा लोकांना पाठ दुखी, कंबर दुखी, पायांमध्ये क्रॅम्प येणे इत्यादी त्रास उद्भवतात अशा लोकांमध्ये हाडांचे फॅक्चर होण्याचे प्रमाण वाढते.
कॅल्शियमची गरज भागवण्यासाठी कोणता आहार घ्यावा?
दूध व दुधापासून बनवलेले पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, नाचणी, सोयाबीन, बदाम, अंजीर, अंडी, मासे इत्यादी दैनंदिन आहारातून आपल्याला कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते.
कॅल्शियम रेगुलेशन
कॅल्शियम शरीरातील विटामिन डी, थायरॉईड हार्मोन आणि कॅल्शिटोनीन याद्वारे नियंत्रित केले जाते. या तीनही घटकांवर ते शरीरातील रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण समतोल राहण्यास मदत होते. विटामिन डी आतड्या मधील व किडनी मधील कॅल्शियम रक्तामध्ये शोषून घेण्यास मदत करते. सूर्यप्रकाशामुळे आपल्याला व्हिटॅमिन-डी भरपूर प्रमाणात मिळते. विटामिन डी ची कमतरता असेल तर हाडातील कॅल्शियम कमी होऊन हाडे ठिसूळ बनतात.
कॅल्शियम युक्त घटक / खनिजे
कॅल्शियम कार्बोनेट ( 40% मूलभूत कॅल्शिअम घटक )
कॅल्शियम साइट्रेट ( 21 टक्के मूलभूत कॅल्शियम घटक )
कॅल्शियम ग्लु को नेट ( नऊ टक्के मूलभूत कॅल्शियम घटक )
कॅल्शियम लॅक्टेट ( तेरा टक्के मूलभूत कॅल्शियम घटक )
कॅल्शियमची कमतरता भासू नये म्हणून काय करावे?
कॅल्शियम युक्त आहार हा एकाच वेळेस न घेता दिवसभरात थोड्या प्रमाणात घ्यावा. जेणेकरून कॅल्शिअम शरीरामध्ये शोषला जातो. धूम्रपान, मध्यपान, लोणचे, मीठ, कॅफीन, कोला, पेप्सी कोला, कोको कोला इत्यादी घटक कॅल्शिअम कमी होण्यास कारणीभूत असतात. त्यामुळे त्यांचे सेवन टाळणे केव्हाही फायदेशीर असते. कॅल्शियमची कमतरता होऊ नये यासाठी आहारातील कॅल्शियम कमी होऊ न देणे महत्त्वाचे आहे. ज्यांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असते ते कॅल्शियमच्या गोळ्या घेऊ शकतात. या गोळ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कॅल्शियमयुक्त घटकांचा समावेश असतो. कॅल्शियम घेताना शरीरातील विटामिन डी योग्य प्रमाणात आहे किंवा नाही याची खात्री करून घेणे व त्यानुसार व्हिटॅमिन-डी घेणे फायद्याचे असते.
Published on: 17 June 2021, 02:21 IST