Health

निरोगी शरीर आणि पोषक आहार शरीराला खूप गरजेचा असतो. आजकाल लोकांना विविध प्रकारचे रोग आणि आजार जडू लागले आहेत याचे कारण सुद्धा मनुष्य च आहे. बदलती जीवनशैली आणि खाण्यातील बदल यामुळे या गोष्टी घडत आहेत.

Updated on 07 September, 2022 2:43 PM IST

निरोगी शरीर आणि पोषक आहार शरीराला खूप गरजेचा असतो. आजकाल लोकांना विविध प्रकारचे रोग आणि आजार जडू लागले आहेत याचे कारण सुद्धा मनुष्य च आहे. बदलती जीवनशैली आणि खाण्यातील बदल यामुळे या गोष्टी घडत आहेत.

पोटावरील वाढती चरबी:-

आजकाल पोटाच्या वाढत्या चरबीने अनेक लोक त्रस्त आहेत. वाढत्या पोटावरील चरबी मुळे लोकांना भयंकर अश्या रोगांची लागण होत असते. त्यामुळे प्रत्येक जण पोटावरील वाढती चरबी कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाय करत आहेत. या काळात बऱ्यापैकी सर्वच लोक व्यायाम आणि डाएट याकडे वळतात. एका चांगल्या डाएट प्लॅन मद्ये सकाळचा पौष्टिक नाश्ता आणि हेवी असायला हवा. डिनर हलकं असावं. तेच डिनर झोपण्याच्या 3 तासांआधी घेतलं पाहिजे. ज्याने तुमची झोप पूर्ण होते. मात्र, तुम्ही डिनरमध्ये काही पदार्थांचा समावेश करणे खूप गरजेचे आहे जेणेकरून तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.

हेही वाचा:- जाणून घ्या, किवी फळाचा रस पिल्यामुले शरीरास होणारे जबरदस्त फायदे, वाचून बसणार नाही विश्वास

मूग डाळ:-
पिवळ्या मूग डाळीमद्ये अनेक पोषक तत्व असतात जे की आपल्या शरीराला अत्यंत फायदशीर असतात. मूग डाळीचे सेवन केल्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर बॅलन्स करण्यात मदत करतात. तसेच मूग डाळीचे सेवन केल्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आहारात मूग डाळीचा समावेश नक्की करा.

साबूदाना खिचडी:-

साबूदान्यामद्ये कार्बोहायड्रेट्स चा मुबलक साठा असतो. साबूदाना खिचडी हे हलकं जेवण असतं. जे तुम्ही उपवासावेळी खाता. पण जर तुम्ही नेहमीच डिनरमध्ये साबूदाना खिडचीचं सेवन करत असाल तर तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.

 

हेही वाचा:-राज्यात वाढता उकाडा,पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, हवामान खात्याच्या अंदाज

पपई चा सलाद:-
वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचा आहार म्हणजे फ्रूट सलाद, आणि व्हेजिटेबल सूप याचे सेवन केल्यास लवकरात लवकर वजन कमी होण्यास सुरुवात होते. पपई बद्धकोष्ठता आणि गॅससारख्या अनेक समस्यांपासून आपल्याला सुटका देते आणि वजन कमी करण्यासही मदत करते. त्यामुळे तुम्ही डिनरमध्ये पपई खाऊ शकता. पपईची खास डिश तयार करण्यासाठी तुम्ही एका बाउलमध्ये पपई, गाजर, काकडीचे काही तुकडे टाका. यात सोया सॉस, राइस विनेगर, कांदा, हिरवी मिरची आणि मीठ टाका. हे तयार झालं तुमचं वजन कमी करण्याचा सलाद.

English Summary: If you want to reduce the increased fat on the stomach immediately, eat this food in dinner, then see the maximum!
Published on: 07 September 2022, 02:43 IST