Health

सध्या कोरोना लॉकडाऊनमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच स्क्रीनशी संबंध येतोच.

Updated on 07 May, 2022 12:32 PM IST

ऑनलाईन स्कूल वर्क फ्रॉम होम यामुळे जास्तीत जास्त वेळ मोबाईल लॅपटॉप याच्यासमोरच जातो. त्यामुळे डोळ्यांवर ताण पडतो परिणामी डोळ्यांची दृष्टी कमजोर होते आणि मग नीट दिसण्यासाठी चष्मा लावण्याशिवाय पर्याय नसतो. अगदी लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत बऱ्याच जणांना अकाली चष्मा लागत आहे.सतत अनेक तास काम करणं आणि बदलत्या जीवनशैलीमुळे चष्मा लागतो आणि चष्म्याचा नंबर वाढतही जातो. दृष्टीची क्षमता वाढवण्यासाठी विशेष असं औषध नाही; पण अशा अनेक थेरपी आहेत, की ज्यांच्या साह्याने चष्म्याचा नंबर नक्कीच कमी केला जाऊ शकतो.

शिरोधारा थेरपी: ही अनेक बाबींसाठी फायदेशीर आहे. या थेरपीमध्ये रुग्णाला टेबलावर झोपवलं जातं. त्यानंतर व्यक्तीच्या कपाळावर सुमारे 30-45 मिनिटं औषधी तेल ओतलं जातं. निद्रानाश, मानसिक तणाव, झोप न लागणे, डोळेदुखी या सर्व समस्या कमी करण्यास शिरोधारा थेरपी मदत करते. काही जणांना मात्र ही थेरपी धोकादायक वाटते.तर्पण थेरपी : या थेरपीमुळे डोळ्यांना थंडावा मिळतो. नेत्रआरोग्यासाठी ही थेरपी उपयुक्त ठरते. या थेरपीमध्ये डोळ्यांभोवती पिठाचा गोळा लावला जातो. डोळ्यांभवती बनलेल्या या खळग्यात औषधी वनस्पतींपासून तयार केलेलं तूप ओतलं जातं. यामुळे डोळ्यांच्या पेशींना पोषण मिळतं. यामुळे दृष्टी वाढण्यास मदत होते. तसंच डोळ्यांचा थकवाही दूर होतो.

आश्चोतन थेरपी : सकस आहार घेऊन आणि व्यायाम करूनही चष्म्याचा नंबर कमी होत नसेल तर आश्चोतन थेरपी खूप उपयुक्त ठरते. आश्चोतन थेरपीमध्ये औषधी वनस्पतींपासून तयार केलेल्या औषधाचे 8-10 थेंब नाकाच्या कँथसवर टाकले जातात. यामुळे डोळ्यांच्या पेशी साफ होण्यास मदत होते.नेत्रधारा थेरपी - चष्म्याचा नंबर सतत वाढत असेल तर नेत्रधारा थेरपी उपयुक्त ठरू शकते. ही थेरपी करताना आडवं झोपवून नाकाच्या कँथसवर 5-6 इंच उंचीवरून 2 ते 3 मिनिटं तेलाची पातळ धार सोडली जाते. यामुळे डोळ्याची स्रोतसं स्वच्छ होतात. ही थेरपी डिटॉक्सिफिकेशनसाठी देखील कार्य करते. डोळ्यांतली विषारी द्रव्यं या थेरपीमधून बाहेर पडतात.

अंजन थेरपी : चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी अंजन थेरपी फायदेशीर ठरते. खनिजं, धातू आणि औषधी वनस्पतींच्या मिश्रणाने बनवलेली औषधं या थेरपीमध्ये वापरण्यात येतात. या सर्व गोष्टी मिक्स करून पेस्ट बनवायची असते आणि नंतर ती डोळ्यांना लावायची असते. त्यामुळे डोळ्यांच्या चष्म्याचा नंबर कमी होण्यास मदत होते.या थेरपी केल्यास दृष्टीमध्ये स्पष्टता आणता येते आणि यामुळे चष्म्याचा नंबरदेखील कमी होऊ शकतो. यासोबतच आहारावरही लक्ष केंद्रित करावं. शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये आणि शरीरासाठी आरोग्यदायी अशा गोष्टी करणं गरजेचं असतं.

 

 Nutritionist & Dietitian 

 Naturopathist

 Dr. Amit Bhorkar

 whats app: 7218332218 

English Summary: If you want to increase your vision, do this therapy
Published on: 07 May 2022, 12:32 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)