आजार झाल्यावर उपचार कारण्यापेक्षा आजार होऊच नये म्हणून काय करायचं. हे शिकवतो आयुर्वेद.धावत्या युगात आधुनिकतेकडे जाताना, पश्चिमात्यांचे अनुकरण करताना आम्ही भारतीयांनी 10,000 किंवा त्यापेक्षाही अधिक वर्षाच्या अभ्यासातून बनलेलं आपलं आरोग्यशास्त्र-आयुर्वेदशास्त्र बाजूला ठेऊन Modern Medical Science ला जवळ केलं.
एवढं जवळ केलं की, त्या औषधींचं जणू व्यसनच लागलंय आम्हाला त्या गोळ्या नाही खाल्या की भट्टीच बिघडते आमच्या शरीराची असं होऊन बसलंय ।पित्ताची गोळी तर महाप्रिय, त्यानंतर ही बी पी ची, ही शुगरची, ही ,थायरॉईडची ही कॅल्शियमची, ही मल्टिव्हिटॅमिनची, आणि हो ही झोपेची, याच्या शिवाय झोपच येत नाही हो... आरे काय हे ? कश्यावर जगताय ? अन्नावर का ह्या गोळ्यांवर ?
नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाला आईचं दूध सोडून Supplement चे डबे चालू केले जातात ! हे डबे बनवणाऱ्या कंपन्या पण ते पोषक अन्न वेगवेगळे इसेन्स टाकून एवढं स्वदिष्ठ करतात की, त्या बाळाला आईच्या दुधा पेक्षा तेच Supplement ज्यास्ती आवडू लागतं. मग बाळ ह्या डब्यावरच मोठं होऊ लागतं. "Side Effects ची भलीमोठी लिस्ट पाठ असून नियमित गोळ्या खाणं भाग असतं " असं आमच्या आतल्या मेंदवावर कोरलेलं असतं.
भारत शासनाद्वारे, Modern Medical Science च्या चिकित्सापद्धतीला राजाश्रय देऊन आजून 1 शतक ही पूर्ण झालेलं नाही, त्याच्या आतच, आधुनिक औषधांचे दुष्परिणाम पाहून पुन्हा आपण तेवढ्या गतीने आयुर्वेदाकडे वळलो आहे. आपणच काय पूर्ण जग या आयुर्वेदाकडे येत आहे ही खूप समाधानाची अन आयुर्वेद उपासकासाठी अभिमानाची बाब आहे..
Nutritionist & Dietician
Naturopathist
Dr. Amit Bhorkar
whats app:7218332218
Published on: 11 May 2022, 06:11 IST